"ज्याला स्वतःच्या क्षमतांची जाणीव असते, तो कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होतो." नवीन वर्षात स्वतःच्या कौशल्यांचा आणि मर्यादांचा विचार करा. त्यानुसार ध्येय निश्चित करून कामाला लागा.
"काळ हाच सर्वात मोठा गुरु आहे; जो काळ वाया घालवतो, तो जीवन वाया घालवतो." नवीन वर्षात वेळेचे व्यवस्थापन हा तुमच्या यशाचा मूलमंत्र ठरेल. प्रत्येक क्षणाची किंमत ओळखून योग्य वापर करा.
"संगत मनुष्याला उंचावर नेत असते किंवा खाली ओढत असते." तुमच्या आयुष्यातील मित्र, सहकारी आणि सल्लागारांची निवड काळजीपूर्वक करा. चांगल्या लोकांची संगत तुम्हाला प्रगतीकडे नेईल.
"जो व्यक्ती कठीण परिस्थितीतही धैर्य सोडत नाही, तो यशस्वी होतो." नवीन वर्षात अडथळे येतीलच, पण संयम आणि धैर्य ठेवून त्यांचा सामना करा.
"विद्या हीच खरी संपत्ती आहे." नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वेळ आणि पैसा गुंतवा. या गुंतवणुकीचे फळ दीर्घकाळासाठी उपयोगी ठरेल.
"परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही." नवीन वर्षात अधिक मेहनत करण्याचा संकल्प करा. फक्त इच्छापूर्तीचा विचार न करता कृतीवर भर द्या.
"ज्याच्याकडे निर्णय क्षमता आहे, तोच खरा नेता आहे." आवश्यक तेथे निर्णय घ्यायला घाबरू नका. योग्य विचार करून ठाम भूमिका घ्या.