चाणक्यांच्या मते मनुष्य आपल्या कर्माने जीवनात यशस्वी होतो. मात्र, सुख भोगणे हे व्यक्तीच्या मागील जन्मातील कर्मांवर अवलंबून असते. हे सुख त्यांना कठोर तपस्या किंवा साधनेमुळे मिळते.
भोज्यं भोजनशक्तिश्च रतिशक्तिर्वराङ्गना ।
विभवो दानशक्तिश्च नाल्पस्य तपसः फलम् ॥
आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यक्तीला पृथ्वीवर चांगले अन्न मिळणे हे नशिबाने मिळते. चांगले अन्न पुरेशा प्रमाणात मिळणे आणि ते पचवण्याची शक्ती असणे हे चांगल्या कर्मांचे फळ आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या पुरुषाला सुंदर पत्नी मिळणे हे सौभाग्य असते. मात्र, सुंदर पत्नीचा चारित्र्यवान असणे हे व्यक्तीच्या पूर्वजन्मातील कर्मांवर अवलंबून असते.
आचार्य चाणक्य म्हणातात , पृथ्वीवर धनवान असणे हेही नशिबावर अवलंबून असते. पण धन मिळवून त्याच्यासोबत दानशील होणे हे व्यक्तीच्या पूर्वजन्मातील सत्कर्मांमुळे शक्य होते.
या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या