आचार्य चाणक्याच्या नीती आजही महत्त्वाच्या आहेत. सामान्य माणूस देखील चाणक्याच्या नीतींचे पालन करून आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो.
'यस्य पुत्रो वशीभूतो भार्या छन्दानुगामिनी।
विभवे यश्च सन्तुष्टस्तस्य स्वर्ग इहैव हि'।।
आचार्य चाणक्य सांगतात की तीन प्रकारचे लोक नेहमीच सुखी आणि संपन्न असतात. हे लोक आपल्या जीवनात नेहमी यशस्वी होतात आणि मोठी प्रगती करतात. दु:ख त्यांना कधीही स्पर्श करत नाही.
आचार्य चाणक्य सांगतात की, ज्या पित्याचा पुत्र त्याच्या आज्ञेत असतो, त्याला या पृथ्वीतलावर स्वर्गासमान सुखाची प्राप्ती होते. तो पिता खरोखरच भाग्यवान असतात.
चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीला आज्ञाधारक पत्नी मिळते, तो माणूस खरा धनवान आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीतलावर सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. असे लोक खूप भाग्यवान असतात.
चाणक्य म्हणतात की, ज्याला देवाने दिलेल्या धनात समाधान मानता येते, तो माणूस नेहमीच सुखी आणि संपन्न असतो. अशा लोकांना जीवनात कधीही दु:खाचा सामना करावा लागत नाही.
या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या