Household Tips : उन्हाळाच्या दिवसात घरात मुंग्या येण्यास सुरूवात होते. यामधील लाल मुंग्यांमुळे खुप त्रास होते. अशातच घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....
Home Remedies for Red Ants : उन्हाळ्याच्या दिवसात लाल मुंग्या घरात येण्यास सुरूवात होते. त्या घरातील सामानाचे नुकसान करतात. लहान साखरेचा डबा असो किंवा घरातील एखादा कोपरा तेथे लाल मुंग्या सहज पोहोचल्या जातात. याशिवाय लाल मुंग्या चावल्याने त्वचेवर लाल डाग येतात. काहीवेळेस सूज आणि खाजही येते. घरात आलेल्या लाल मुंग्यांना घालवण्यासाठी तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करू शकता.
मीठ (Salt)
घरात आलेल्या लाल मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मीठाचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ मिक्स करा. यानंतर मिठाच्या पाण्याने फरशी किंवा भिंत पुसल्याने तेथे लाल मुंग्यांचा वावर कमी होईल. हा एक सर्वसाधारण उपाय असला तरीही लाल मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी उपयुक्त आहे.
व्हिनेगर (Vinegar)
अर्धा कप व्हिनेगर एका वाटीत घेऊन त्यात अर्धा कप पाणी मिक्स करा. व्हिनेगरचे लिक्विड स्प्रे बॉटेलमध्ये भरा. लाल मुंग्या ज्या ठिकाणी दिसतायत तेथे बॉटलमधील पाणी स्प्रे करा. काही वेळातच लाल मुंग्या तेथून दूर झाल्याचे दिसून येईल.
लसूण (Garlic)
मुंग्यांना लसणीचा वास अजिबात आवडत नाही. घरातील लाल मुंग्यांना पळवण्यासाठी लसूणची बारीक पेस्ट तयार करा. लसणाची पेस्ट रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि जेथे लाल मुंग्या दिसतायत तेथे स्प्रे करा.
संत्र आणि लिंबू (Orange and Lemon)
संत्र आणि लिंबूचा रस लाल मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी कामी येईल. यासाठी संत्र आणि लिंबाचा रस काढून स्प्रे बॉटलमध्ये भरा. या रसात गरम पाणीही मिक्स करा. मुंग्यांना घालवण्यासाठी तयार केलेले लिक्विड घराच्या कोपऱ्यात किंवा जेथे लाल मुंग्या दिसतायत तेथे स्प्रे करा. यामुळे लाल मुंग्या घरातून निघून जाण्यास मदत होईल.
हळद आणि तुरटीची पावडर (Turmeric and Alum Powder)
बारीक पुड केलेली हळद आणि तुरटीची पावडर समप्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण लाल मुंग्यांच्या ठिकाणी ठेवून द्या. अशातच लाल मुंग्या निघून जातील.
आणखी वाचा :
तुम्ही दररोज Overthinking करता? या टिप्सच्या मदतीने रहाल दूर
पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार आहात? या गोष्टींची घ्या काळजी