Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 : भीमरावांच्या आयुष्यातील हे खास किस्से माहितेयत का?

Published : Apr 13, 2024, 03:02 PM ISTUpdated : Apr 13, 2024, 03:07 PM IST
Ambedkar Jayanti 2023

सार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशातील मागासवर्गीय, दलित आणि गरिबांच्या उन्नतीसाठी घालवले. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 : देशातील वंचितांना स्वत:चे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यभर लढा दिला. याशिवाय बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे ‘शिल्पकार’ म्हटले जाते. 14 एप्रिलला असणाऱ्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से जाणून घेऊया....

अस्पृश्यतेचा आजीवन विरोध केला
14 भावंडांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने शाळेचे शिक्षण पूर्ण केले. शाळेतील हुशार विद्यार्थी असूनही बाबासाहेबांना अन्य विद्यार्थ्यांपासून दूर बसवले जायचे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. याच सर्व गोष्टींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा आजीवन विरोध केला. याशिवाय समाजातील दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर लढा दिला.

कसे पडले आंबेडकर नाव?
आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. पण आंबेडकरांनी एका ब्राम्हण शिक्षक महादेव आंबेडकर यांच्या सांगण्यावरून आपल्या नावातून सकपाळ हटवले. यामुळेच बाबासाहेबांनी आपले आडनाव आंबेडकर लावण्यास सुरूवात केली. (Dr. Babasheb Ambedkar life facts)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ब्राह्मण समाज
बाबासाहेबांच्या दोन पत्नी होत्या. त्यांचा साखरपुडा रमाबाई यांच्यासोबत हिंदू पद्धतीने झाला होता. त्यावेळी रमाबाई अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर रमाबाई यांनी मुलगा यशवंत याला जन्म दिला. वर्ष 1935 मध्ये रमाबाई यांचे निधन झाले. यानंतर बाबासाहेबांनी दुसरे लग्न केले असता समाजाने त्याचा विरोध केला. बाबासाहेबांनी पुण्यातील ब्राम्हण परिवारातील सविता यांच्यासोबत विवाह केला. सविता फार हुशार होत्या. याशिवाय त्यांनी मुंबईतून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते.

प्राध्यापक असूनही जातीवादाचा केला सामना
लंडनमध्ये शिक्षणादरम्यान बाबासाहेबांची स्कॉलरशिप पूर्ण झाल्यानंतर ते भारतात परतले गेले. मुंबईतील महाविद्यालयात बाबासाहेब प्राध्यपकाची नोकरी करू लागले होते. येथेही बाबासाहेबांना जातीवादाचा सामना करावा लागला. यामुळेच आंबेडकरांनी दलितांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले.

आणखी वाचा : 

Dr. Babasaheb Ambedkar यांचे हे अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य

Rama Navami 2024: रामनवमीला अयोध्येला जायचंय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, दर्शनासाठी नवे नियम जारी

Chitra Navratri च्या उपवासासाठी खास शेंगण्याचे सॅलड, वाचा संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप

PREV

Recommended Stories

Horoscope 8 December : आज सोमवारचे राशिभविष्य, या राशीच्या काही लोकांना प्रत्यक्ष तर काहींना अप्रत्यक्ष मोठा धनलाभ!
अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!