Healthy Smoothies : पोट हलकं आणि निरोगी ठेवण्यासाठी ५ हेल्दी स्मूदी ट्राय करा. केळी-दही, पपई-आलं, काकडी-पुदिना यांसारख्या स्मूदी पचन सुधारतात आणि गॅस, पोट फुगणे व जडपणापासून आराम देतात. जाणून घ्या कोणती स्मूदी का फायदेशीर आहे.
पोटाला हलकं वाटावं यासाठी पपईची स्मूदी प्या. पपईमधील 'पपेन' एन्झाइम अन्न लवकर पचवते. आल्यामुळे पोटाची सूज कमी होते. जड जेवणानंतर किंवा बद्धकोष्ठतेमध्ये ही स्मूदी फायदेशीर आहे.
25
सफरचंद आणि ओट्स स्मूदी
पोट हलकं ठेवण्यासाठी सफरचंद आणि ओट्सची स्मूदी प्या. सफरचंदमधील फायबर पोट साफ करते. वारंवार भूक लागल्यास किंवा पोट फुगल्यास, सफरचंद आणि भाजलेल्या ओट्सची स्मूदी बनवून प्या.
35
केळी आणि दह्याची स्मूदी
केळ्यामध्ये फायबर आणि दह्यात प्रोबायोटिक्स असल्याने पचन सुधारते. केळी आणि दही एकत्र करून चविष्ट स्मूदी बनवा. सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर पिण्यासाठी उत्तम.
पुदिना पचनसंस्थेला थंडावा देतो आणि गॅसची समस्या कमी करतो. ताज्या पुदिन्याची पाने किवीसोबत मिसळून स्मूदी बनवा. यामुळे पोट हलके वाटेल आणि ताजेतवानेही वाटेल. तेलकट जेवणानंतर ही स्मूदी नक्की ट्राय करा.
55
अननस आणि नारळ पाणी स्मूदी
पिकलेल्या अननसाचा गर नारळाच्या पाण्यासोबत मिसळून चविष्ट स्मूदी तयार करा. अननसमध्ये 'ब्रोमेलेन' एन्झाइम असते, जे पचनक्रिया गतिमान करते. नारळ पाणी पोटाला थंडावा देते. बाहेरचे जेवल्यानंतर ही स्मूदी पिऊ शकता.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.