उन्हाळ्याच्या दिवसात पोटासंबंधित समस्या उद्भवणे सामान्य बाब आहे. पण बहुतांशजणांना उन्हाळ्यात भयंकर दुखते किंवा पोटात आग पडल्यासारखे जाणवते. खरंतर, अत्याधिक तेलकट-तिखट किंवा चहा-कॉफीचे सेवन केल्याने पोटात उष्णता वाढली जाते. यावर उपाय काय जाणून घेऊया…
Summer Health Care Tips : उन्हाळ्याच्या दिवसातील तापमानामुळे घराबाहेर पडणे ही नकोसे वाटते. याशिवाय काही खाण्याची इच्छा देखील होत नाही. उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण बहुतांशजणांना उन्हाळ्याच्या काळात पोटासंबंधित समस्या अधिक वाढल्या जातात. यामागे काही कारणे असू शकतात. खरंतर, उन्हाळ्यात अत्याधिक तेलकट, तिखट किंवा उष्ण पदार्थांचे सेवन करणे टाळावे असा सल्ला दिला जातो. अशातच पोटात उष्णता जाणवत असल्यास यावर उपाय काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
दररोज पुदिन्याचे सेवन करा
पुदिनाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पोटाला थंडावा मिळतो. पुदिन्याची पाने उपाशी पोटी सेवन केल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत करते. यासाठी पुदिन्याची चटणी किंवा पाने पाण्यात टाकून पाणी पिऊ शकता.
केळ्याचे सेवन
केळ्यात कॅल्शिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोटॅशिअममुळे पोटातील अॅसिडचा स्तर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. केळ्याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो. याशिवाय पचनक्रिया सुधारली जाते.
थंड दूध प्या
दररोज नाश्ताला थंड दूध प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होऊ शकते. दूधात असणारे कॅल्शिअम पोटातील उष्णता शोषून घेते. दूध एकमेव असे प्रोडक्ट आहे ज्यामधअये प्रत्येक प्रकारची पोषण तत्त्वे आढळतात.
बडीशेपचे सेवन
पोटात उष्णता जाणवत असल्यास त्यापासून आराम मिळण्यासाठी बडीशेपचे सेवन करा. यासाठी दररोज एक चमचा बडीशेपचे आणि खडीसाखरचे सेवन करा. यामुळे पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होईल. याशिवाय एक ग्लास गरम पाण्यात बडीशेप मिक्स करुन असे पाणी दररोज पिऊ शकता. (Unhalyat Potat Ushnata Janavte Tyavr Sope Upay)
काकडीचे सेवन करा
उन्हाळ्याच्या दिवसात डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काकडीचे सेवन करू शकता. काकडीमध्ये पोटाला थंडावा देणारे गुणधर्म असतात. याशिवाय काकडीच्या सेवनाने शरिर डिटॉक्स करण्यासही मदत होते. वजन कमी करणे ते पोटातील उष्णता कमी करण्यास मदत होते. यासाठी काकडीचा ज्यूस किंवा सॅलडचे दररोज सेवन करू शकता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :