तुम्हाला ॲसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ याचा त्रास होतो का? मग डॉक्टरांनी सांगितलेले हे ५ सोपे उपाय करून पाहा. शुगर-फ्री च्युइंग गम, डाव्या कुशीवर झोपणे आणि जेवणानंतर चालण्याने औषधांशिवाय आराम मिळू शकतो.
ॲसिड रिफ्लक्स म्हणजे पोटातील ॲसिड अन्ननलिकेत परत येणे. यामुळे आंबट ढेकर आणि छातीत जळजळ होते. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी यावर काही सोपे उपाय सांगितले आहेत. शुगर-फ्री च्युइंग गम चघळल्याने गिळण्याची प्रक्रिया वाढते, ज्यामुळे ॲसिड कमी होऊन अन्ननलिकेतून परत पोटात जाते. मात्र, मिंट फ्लेवरचं च्युइंग गम टाळा.
25
डाव्या कुशीवर झोपा
तुम्हाला ॲसिड रिफ्लक्सचा त्रास असेल, तर नेहमी डाव्या कुशीवर झोपा. असं केल्याने ॲसिडचा वेग कमी होतो आणि अन्ननलिकेपर्यंत ॲसिड पोहोचण्याचा धोका टळतो. उजव्या कुशीवर झोपल्यास हा फायदा मिळत नाही. त्यामुळे तुमची झोपण्याची सवय लगेच बदला.
35
झोपण्याच्या २ ते ३ तास आधी जेवा
झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी जेवण करा. जे लोक जेवल्यानंतर लगेच किंवा तासाभरात झोपतात, त्यांच्यात ॲसिड रिफ्लक्सचा त्रास अचानक वाढतो. जेवणानंतर ३ तासांनी झोपल्यास ॲसिड एक्सपोजर होत नाही आणि त्रास टळतो.
जर तुम्हाला वारंवार ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होत असेल, तर डोकं उंच ठेवून झोपा. डॉ. सौरभ सेठी सांगतात की, असं केल्याने ॲसिड एक्सपोजर ६७% पर्यंत कमी होऊ शकतं. हे अभ्यासातही सिद्ध झालं आहे. तुम्ही जवळपास ६ ते ८ इंच डोकं उंच ठेवून झोपायला हवं, यासाठी उशी हा उत्तम पर्याय आहे.
55
जेवणानंतर रोज चाला
तुम्ही सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर फक्त १० मिनिटं चाललात, तरी ॲसिड रिफ्लक्सची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या १० वर्षांच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये त्यांना हे जाणवलं आहे की जेवणानंतर १० मिनिटं चालल्याने ॲसिड रिफ्लक्सच्या त्रासात खूप आराम मिळतो. l