12 तास ओठांवर टिकून राहिल लिपस्टिक, लक्षात ठेवा या 5 खास ट्रिक
मेकअपमुळे प्रत्येक महिलेचे सौंदर्य खुलले जाते. यावेळी लिपस्टिकही जरुर लावली जाते. पण महागडी लिपस्टिक लावूनही ओठांवर दीर्घकाळ टिकत नाही अशी बहुतांश महिलांची तक्रार असते. याबद्दलच्या काही खास ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
मेकअप करणे प्रत्येक महिलेला पसंत असते. दररोज हेव्ही मेकअप करणे शक्य नसतेच. पण बेसिक मेकअपसोबत लिपस्टिक लावूनही सौंदर्य खुलले जाते. अशातच बहुतांश महिला लिपस्टिकच्या वेगवेगळ्या रंगातील शेड्स खरेदी करतात. महागडी लिपस्टिक लावल्यानंतरही ती ओठांवर दीर्घकाळ टिकून राहत नाही. यावर ट्रिक काय हे जाणून घेणार आहोत.
लिप लायनरचा करा वापर
लिपस्टिक लावल्यानंतर थोड्याच वेळात त्याचा रंग फिकट होतो अथवा पुसली जाते. यावर सोपी ट्रिक म्हणजे लिप लायनरचा वापर करणे. नेहमीच वॉटर प्रुफ लिप लायनरचा ओठांवर दीर्घकाळ लिपस्टिक टिकून राहण्यासाठी वापर करावा.
पावडरच्या मदतीने लिपस्टिक दीर्घकाळ ओठांवर टिकवून ठेवू शकता. सर्वप्रथम लिपस्टिप ओठांवर लावा. यावर लूज पावडर लावून ब्रशच्या मदतीने सेट करा. यामुळे लिपस्टिक आणि मेकअप संपूर्ण दिवस व्यवस्थितीत टिकून राहिल.
ओठ हायड्रेट ठेवा
कोरड्या अथवा फाटलेल्या ओठांवर लिपस्टिक दीर्घकाळ टिकून राहत नाही. अशातच ओठ हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी केमिकल फ्री लिप बामचा वापर करा.
हायड्रेटिंग फॉर्म्युला असणारी लिपस्टिक
लिपस्टिक लावल्यानंतर त्याचा रंग लगेच फिका पडत असल्यास नेहमीच हाइड्रेटिंग फॉर्म्युला असणारी लिपस्टिक वापरा. यामुळे दीर्घकाळ लिपस्टिक ओठांवर टिकून राहिल.
टिश्यू पेपरने सेट करा लिपस्टिक
कमी पैशांमध्ये लिपस्टिक लॉन्ग लास्टिंग तयार करायची अल्यास टिश्यू पेपरचा वापर करू शकता. सर्वप्रथम ओठांवर लिपस्टिक लावा आणि त्यावर टिश्यू पेपरने डॅप करा. यामुळे ओठांना लागलेली अत्याधिक लिपस्टिक निघून जाईल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)