चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे चेहऱ्याच्या एक्सरसाइज करणे. यामुळे कालांतराने चेहऱ्यावरील चरबी कमी होऊन फेस लाइनही दिसण्यास मदत होते.
स्वत:ला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्या. पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.
खाण्यापिण्यात रिफाइंड कार्ब्स पासून दूर रहा. कुकीजस पास्ता अशा काही पदार्थांमध्ये उच्च प्रमाणात रिफाइंड कार्ब्स आढळतात. यामुळे चेहऱ्यावरील चरबी वाढली जाते.
अन्नपदार्थांमध्ये मीठाचा अत्याधिक वापर करणे टाळा. यामुळे चेहऱ्याला सूज येण्यासह फुललेला दिसतो.
प्रोटीनयुक्त पदार्थांचे भरपूर सेवन करा. यामुळे शरिरातील स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते. अंडी, भाज्या अथवा फळांचे सेवन करू शकता.
कोल्डड्रिंक्समध्ये उच्च प्रमाणात साखर असते. यामुळे चेहऱ्यावरील चरबी वाढली जाते. अशातच साखरयुक्त ड्रिंक्सपासून दूर रहा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.