जगातील या 5 देशांमध्ये विमानतळ नाहीत, तरीही पर्यटक अशी घेतात पर्यटनाची मजा

Published : Nov 04, 2024, 08:39 AM ISTUpdated : Nov 04, 2024, 08:57 AM IST
5 Beautiful Countries Without Airports

सार

5 Beautiful Countries Without Airports : जगातील असे काही देश जेथे पोहोचण्यासाठी विमातळ नाहीत. तरीही पर्यटक तेथील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दूरदूरवरुन येतात. जाणून घेऊया अशाच काही ठिकाणांबद्दल सविस्तर...

5 Beautiful Countries Without Airports : आजच्या बदलत्या जगात विमानतळ नसलेल्या देशांची कल्पना करणे कठीण आहे. तरीही, काही राष्ट्रांमध्ये कोणतेही विमानतळ नसले तरीही तेथील ठिकाणाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक फार मोठी गर्दी करतात. जाणून घेऊया जगातील असे पाच देश जेथे विमानतळ नाहीत. पण तेथील सौंदर्य पर्यटकांना त्यांच्या प्रेमात पाडते. 

अंडोरा (Andorra)


फ्रान्स आणि स्पेन दरम्यान पायरेनीस पर्वतरांगांमध्ये वसलेले अंडोरा हे स्की रिसॉर्ट्स आणि ड्युटी फ्री शॉपिंगसाठी ओखळले जाते. पर्यटक येथे फ्रान्स टूलूस-ब्लॅग्नाक विमानतळ किंवा स्पेनच्या बार्सिलोना-एल-प्रॅट विमानतळावरुन अंडोरा येथे पोहोचण्यासाठी प्रवास करतात. ही दोन्ही विमानतळे अंडोरापासून 150 किमी दूरवर आहेत.

व्हॅटिकन सिटी (Vatican City)


जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटी ओखळला जातो. व्हॅटिकन सिटी केवळ 0.49 चौरस किलोमीटरमध्ये पसरला असून रोम, इटलीमध्ये आहे. येथे भेट देण्यासाठी पर्यटक रोममधील लिओनार्डो दा विंची-फियुमिसिनो विमानतळापासून सुमारे 30 किमी अंतरावर उतरतात.

मोनॅको (Monaco)


लक्झरी कॅसिनो, बंदर आणि प्रतिष्ठित ग्रँड प्रिक्ससाठी प्रसिद्ध असणारे मोनॅको श्रीमंत लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणापासून सर्वाधिक जवळचे फ्रान्समधील Nice Cote d'Azur विमानतळ आहे. जे मोनॅकोपासून 30 किमीच्या अंतरावर आहे.

सॅन मारिनो (San Marino)


जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकांपैकी एक सॅन मॅरिनो डोंगराळ भागात असणारे लहान राज्य आहे. सॅन मारिनोला संपूर्ण इटलीने वेढलेले असून 61 चौरस किलोमीटरवर विस्तारलेले आहे. सॅन मारिनोला पोहोचण्यासाठी पर्यटक 25 किमी अंतरावर असणाऱ्या रिमिनीमधील इटलीच्या फेडेरिको फेलिनी विमानतळावर उतरतात.

लिकटेंस्टाईन (Liechtenstein)


अप्रतिम अल्पाइन लँडस्केप आणि मध्ययुगीन रचनांसाठी ओळखला जाणारा लिकटेंस्टाईन देश स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांच्यामध्ये 160 चौरस किलोमीटर व्यापलेला आहे. येथे पोहोचण्यासाठी स्वित्झर्लंडमधील झुरिच विमानतळावरावर पर्यटक उतरतात.

आणखी वाचा : 

जागतिक व्हेगन दिन २०२४: व्हेगन आहाराचे फायदे

दररोज धण्याचे पाणी प्यायल्याने होणारे 5 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

PREV

Recommended Stories

हिऱ्यांचा लूक फक्त ₹2K मध्ये! स्टोन वर्कसह चांदीच्या मंगळसूत्र डिझाईन्स; पाहा बजेटमधील 'डायमंड' कलेक्शन!
घराची शोभा वाढवतील ही ५ रंगीबेरंगी पानांची इनडोअर रोपे, हिवाळ्यात घरात करा लागवड