चेहऱ्यावर हळदीचा फेस पॅक लावताना करू नका या 4 चुका, त्वचा होईल डल

स्किन केअरसाठी काहीजण घरगुती उपाय करतात. यावेळी हळदीचा वापर नक्कीच केला जातो. पण हळदीचा चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी योग्य प्रकारे वापर कसा करायचा याबद्दल माहितेय का?

Skin Care in Winter : थंडीच्या दिवसात चेहऱ्याची त्वचा कोरडी होऊ लागते. यामुळे चेहऱ्याचे तेज कमी झाल्यासारखे वाटू लागते. अशातच ग्लोइंग त्वचेसाठी बहुतांशजण वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स आणि घरगुती उपाय करतात. जेणेकरुन चेहऱ्यावर ग्लो येईल. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी हळद, मध, दूध अशा काही वस्तूंचा वापर केला जातो. मात्र चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी फेस पॅकमध्ये हळदीचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

या वस्तू मिक्स करू नका
चेहऱ्यावर ग्लो येण्यालाठी हळदीचा वापर करत असताना त्यामध्ये लिंबाचा रस आणि काकडीचा रस मिक्स करू नका. लिंबाच्या रसात सिट्रिक अ‍ॅसिड असल्याने त्वचेवर जळजळ आणि लाल चट्टे येण्याची समस्या उद्भवली जाऊ शकते. याशिवाय काकडीचा रस थंड आणि हळद उष्ण असल्याने दोन्ही गोष्टी एकत्रित केल्यास त्वचा अधिक लाल होऊ शकते.

20 मिनिटेच लावा
बहुतांशजण एखादा फेस पॅक लावून काम करू लागतात. पण हळदीचा फेस पॅक केवळ 20 मिनिटेच चेहऱ्यावर लावून स्वच्छ पाण्याने धुवा. अन्यथा चेहऱ्यावर हळदीचा रंग उतरला जाईल आणि चेहरा पिवळसर दिसू लागेल.

साबणाचा वापर करू नका
चेहऱ्यावर हळदीचा पॅक लावल्यानंतर साबणाचा वापर करू नये. यावेळी पाण्याचा वापर करावा. याशिवाय हळदीचा फेस पॅक धुतल्यानंतर मॉइश्चराइजरचा वापर करावा.

असा करा वापर
चेहऱ्यावर हळदीचा वापर करण्यासाठी त्यामध्ये बेसन, कोरफड, दूध किंवा मधाचा वापर करावा. हळदीत मधाचा वापर केल्यास त्याचा पिवळसर रंग चेहऱ्यावर उतरला जात नाही. याशिवाय एखाद्या नैसर्गिक प्रोडक्ट्सपासून अ‍ॅलर्जी असल्यास पॅच टेस्ट नक्की करून पाहा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

थंडीत संत्र्याचे सेवन करावे की नाही? वाचा काय म्हणतात हेल्थ एक्सपर्ट्स

ग्लोइंग त्वचेसाठी प्या या 3 आयुर्वेदिक पावडरची खास चहा

Share this article