ग्रीन टी च्या बॅग फेकून देण्याएवजी तयार करा हे 4 फेस पॅक, उजळेल त्वचा

Published : Nov 29, 2024, 05:28 PM IST
Make face pack with green tea bags

सार

ग्रीन टी च्या फेस पॅकमुळे त्वचेला नैसर्गिक रुपात ग्लो येण्यास मदत होईल. यासाठी मुल्तानी माती, हळद, तांदळाचे पीठ आणि केळ्यासोबत ग्रीन टी चा वापर करू शकता. यामुळे डेड स्किन हटण्यासह पिंपल्सची समस्या दूर होईल.

Green Tea Face pack for glowing skin : ग्रीन टी च्या सेवनाने वजन कमी होणे ते मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर ठरते. ग्रीन टी प्यायल्याने शरिरातील अँटीऑक्सिडेंट्स मिळतात, ज्यामुळे त्वचेला फायदा होतो. अशातच ग्रीन टी तयार केल्यानंतर वापरलेल्या बॅग्स रियुज करू शकता. जाणून घेऊया ग्रीन टी पासून कोणत्या 4 प्रकारचे फेस पॅक तयार करू शकता याबद्दल सविस्तर...

मुल्तानी माती आणि ग्रीन टी फेस पॅक

मुल्तानी मातीमध्ये हाइड्रेटिंग गुणधर्म असतात. यामुळे त्वचेमधील ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय डेड स्किन हटण्यासह त्वचेमधील अत्याधिक तेल निघते. फेस पॅक तयार करण्यासाठी एक टीस्पूच मुल्तानी मातीत ग्रीन टी मिक्स करा. ओलसर टी बॅगमधील ओलाव्यामुळे पेस्ट तयार होईल. टी बॅग ओलसर नसल्यास त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. यापासून तयार करण्यात आलेला फेस पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेला ग्लो येईल.

तांदळाचे पीठ आणि ग्रीन टी

त्वचा अधिक डल झाली असल्यास त्याच्या एक्सफोलिएशनसाठी तांदळाचे पीठ आणि ग्रीन टी चा फेस पॅक तयार करू शकता. पॅक चेहऱ्याला लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन दूर होईल.

हळदीत मिक्स करा ग्रीन टी

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी ग्रीन टी सोबत हळद मिक्स करून लावू शकता. यामुळे इन्फेक्शनची समस्या दूर होईल. यासाठी एक चिमूटभर छोलेच्या पीठामध्ये अर्धा चमचा हळद आणि ग्रीन टी मिक्स करा. याचा फेस पॅक तयार करून चेहऱ्याला लावा. दोन आठवड्यानंतर चेहऱ्यामधील फरक पाहा.

केळ आणि ग्रीन टी

थंडीच्या दिवसात त्वचा अधिक कोरडी होत असल्याने त्यामध्ये पिकलेले केळ आणि ग्रीन टी मिक्स करून लावू शकता. यामुळे त्वचा मॉइश्चराइज होण्यास मदत होईल. खरंतर, ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडेंट्समुळे फ्री रेडिकल्स दूर होत त्वचेला ग्लो येतो.

आणखी वाचा : 

थंडीतही आयस्क्रिमसारखे घरच्याघरी तयार करा दही, वाचा मास्टरशेफची खास टीप

आठवड्याभरात वजन कमी करण्यासाठी खा अळशी

PREV

Recommended Stories

हिवाळ्यात पायांचे सौंदर्य वाढवा, निवडा फॅन्सी फ्लॉवर जोडवी डिझाइन
फक्त 3 ग्रॅममध्ये रॉयल नथ! लग्नासाठी बनवा 'हे' स्टायलिश आणि मजबूत डिझाईन्स!