प्राचीन काळापासूनच योगाभ्यास करणे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरिरात उर्जा टिकून राहते. अशातच स्वत:ला मानसिक आणि शारिरीक रुपात फिट ठेवण्यासाठी यंदाच्या वर्षात काही सोपे योगासने करू शकता.
3 Yoga Pose for Mental Health and Fitness : योगाभ्यासाचे फायदे सर्वांनाच माहिती आहे. योगा एक प्राचीन अभ्यास आहे. सध्या संपूर्ण जगभरात योगाभ्यासाच्या माध्यमातून बहुतांशजण हेल्दी आणि फिट राहण्याचा प्रयत्न करतात. यामुळे केवळ वजनच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारले जाते. याशिवाय दररोज योगाभ्यास केल्याने अंग दुखी ते आरोग्यासंबंधित काही समस्या दूर राहण्यास मदत होते. अशातच फिट आणि मानसिक आरोग्यासाठी कोणते योगासने करावीत याबद्दल पुढे जाणून घेऊया.
दररोज तुम्ही बालासन करु शकता. याला इंग्रजीमध्ये चाइल्ड पोज असे म्हटले जाते. बालासन केल्याने शरीर आणि मन रिलॅक्स राहण्यास मदत होते. याशिवाय अन्य समस्याही दूर राहतात.
भुजंगासन केल्याने स्नायू मजबूत होण्यासह बॉडी पोश्चर व्यवस्थितीत राहण्यास मदत होते. याशिवाय थकवा, तणाव दूर होण्यासह बद्धकोष्ठता, अॅसिडीटीची समस्याही कमी होते.
वीरभद्रासन एक शक्तीशाली योगा पोज आहे. याला इंग्रजीमध्ये वॉरियर पोज असे म्हटले जाते. वीरभद्रासन केल्याने अंग दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.
आणखी वाचा :