Makar Sankranti 2025 : आज देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी तिळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणत एकमेकांना तिळाचा लाडू दिला जातो. अशातच मकर संक्रांतीनिमित्त खास मराठमोळे संदेश मित्रपरिवाराला पाठवून आजचा सण साजरा करा.
Makar Sankranti 2025 Wishes in Marathi : आज (14 जानेवारी) देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा मार्गक्रमण याला संक्रांत असे म्हणतात. सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत असे म्हटले जाते. शिवाय मकर संक्रांतीला तिळाचे लाडू एकमेकांना देत तिळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणत सण साजरा केला जातो. आजच्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मित्रपरिवाराला खास मराठमोळे संदेश, मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून नात्यामधील गोडवा अधिक वाढवा.
आणखी वाचा :
मकरसंक्रांतीला ओवसा का नेला जातो, काय आहे आख्यायिका?
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला लहान मुलांचे बोरन्हाण का करतात?