Viral Video: रील्सच्या नादात महिलेने रेल्वे प्लॅटफॉर्मवरच केली कोल्ड ड्रिंकने आंघोळ!

vivek panmand   | CMS
Published : Oct 01, 2026, 10:56 PM IST
Viral Video: रील्सच्या नादात महिलेने रेल्वे प्लॅटफॉर्मवरच केली कोल्ड ड्रिंकने आंघोळ!

सार

बिहारच्या बख्तियारपूर रेल्वे स्टेशनवर एका महिलेने चक्क कोल्ड ड्रिंकने आंघोळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी केलेल्या या प्रकारावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पाटणा: आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. काही लोक फक्त मनोरंजनासाठी सोशल मीडिया वापरतात, तर काही जण लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी काहीही विचित्र उद्योग करायला मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना बिहारच्या बख्तियारपूर रेल्वे स्टेशनवर घडली आहे. इथे एका महिलेने रेल्वे प्लॅटफॉर्मवरच उभं राहून चक्क कोल्ड ड्रिंकने आंघोळ केली असून, तिचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही महिला कॅमेऱ्यासमोर उभी राहून कोका-कोलाची (Coca-Cola) पूर्ण बाटली स्वतःच्या अंगावर ओतून घेत आहे. रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी एका महिलेला असं कोल्ड ड्रिंकने आंघोळ करताना पाहून तिथले प्रवासी आणि नेटकरी चांगलेच चक्रावून गेले आहेत.

नेटकऱ्यांचा तीव्र संताप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. आजकाल सोशल मीडियावर 'व्हायरल' होण्याच्या शर्यतीत सार्वजनिक ठिकाणांचा गैरवापर करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे, अशी टीका अनेकांनी केली आहे. लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठीच हा 'रील्स'चा (Reels) स्टंट मुद्दाम शूट करण्यात आल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

सार्वजनिक ठिकाणची शिस्त आणि स्वच्छतेचा प्रश्न

रेल्वे स्टेशन हे रोज लाखो लोक प्रवास करणारं एक अत्यंत महत्त्वाचं सार्वजनिक ठिकाण आहे. कोणताही कंटेन्ट किंवा रील्स बनवताना सार्वजनिक ठिकाणची शिस्त, स्वच्छता आणि इतर प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात ठेवणं बंधनकारक आहे, असं मत सामान्य लोक आणि नेटकऱ्यांनी मांडलं आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सार्वजनिक व्यवस्थेचा असा बोजवारा उडवणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत शूट केला गेलाय, याची कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसंच, या व्हिडीओमधील महिलेची ओळखही पटलेली नाही. त्यामुळे फक्त या व्हायरल व्हिडीओच्या आधारावर कोणाही एका व्यक्तीबद्दल लगेच निष्कर्ष काढता येणार नसला, तरी बख्तियारपूर जंक्शनचा हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चर्चेचा मोठा विषय ठरला आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department