
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. ते भाजपचे मागील टर्मचे खासदार सुजय विखे यांच्या विरोधात उभे राहणार आहेत. आमदार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोहता देवी येथून करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना निलेश लंके यांनी म्हटले आहे की, "निवडणुकीला सामोरे जाण्याच्या आधी अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत. "स्वाभिमान जनसंवाद" यात्रेच्या माध्यमातून या समस्या जाणून घेणार आहोत. मोहटा देवीचे दर्शन घेऊन सुरू झालेली ही स्वारी आता थेट दिल्लीत जाऊन थांबेल, असे त्यांनी म्हटले. निलेश लंके यांनी यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन केलं आहे.
सुजय विखेंच्या डाळ वाटप कार्यक्रमावर केली टीका -
निवडून आल्यानंतर काहीजण थेट पाच वर्षांनी डाळ आणि साखर वाटप करायला आले आहे, असे म्हणत निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या वाटपावर टीका केली आहे. स्वाभिमानी यात्रेच्या शेवटच्या दिवशी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत मी कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येईल असं त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा -
एक दिवस रवी राणा भाजपमध्ये येतील, भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला गौप्य्स्फोट
चीनने दिली भारताला चेतावणी, बीजिंगने अरुणाचल प्रदेशातील 30 नावांची नवीन यादी केली जाहीर