महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार, या राज्यांमध्ये मात्र धो धो अतिवृष्टी होणार

Published : Jul 15, 2026, 05:33 PM IST
Monsoon Health

सार

देशातील हवामानात मोठी उलथापालथ होत असून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. याउलट, उत्तर भारतासह देशातील १५ राज्यांमध्ये १६ ते २० जुलै दरम्यान जोरदार वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांना आणि मच्छिमारांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.

देशातील पावसाच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. सध्याच्या घडीला हवामानात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली. महाराष्ट्रातून सध्याच्या घडीला पाऊस गायब झाला की काय असं वाटत आहे. उत्तर भारतासह भारतातील १५ राज्यांमध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागरिकांना हवामान विभागानं केलं अवाहन 

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं यावेळी हवामान विभागानं सांगितलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावं अन्यथा घरीच थांबावं असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. समुद्रात वादळी वारे तयार होणार आहेत. त्यामुळं मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

प्रमुख राज्यांचा काय आहे हवामान 

अंदाज प्रमुख राज्यांचा अंदाज यावेळी हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. दिल्लीसह, नोएडा, गाझियाबाद, आणि गुरुग्राममध्ये १६ ते २० जुलैच्या दरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी ४० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार येथे १६ ते २० जुलैच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि दार्जिलिंग येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून येथे ताशी ५० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये विशेषतः मध्य प्रदेशात पावसाचा जोर वाढणार आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Muhammad Yunus: 'तू दहशतवादी आहेस, इथे का आलास?' अमेरिकेत मोहम्मद युनूस यांना घेराव
Kanpur Robbery: ५० CCTV, ४ गार्ड्स; तरीही कानपूरमध्ये भाजप नेत्याला पिस्तुलाचा धाक दाखवून १२ लाखांची लूट