पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन आणि ऊर्जा बचतीचे आवाहन केले आहे. यासोबतच, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनुसार, सुमारे 40 देशांनी ऊर्जा बचतीसाठी वर्क फ्रॉम होम, एसी वापरावर मर्यादा आणि वाहतूक नियमांसारखे विशेष उपाय लागू केले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना काय केलं अवाहन, कोणत्या देशात काय निर्बंध?
नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, प्रवास मर्यादित ठेवण्याचे आणि ऊर्जा बचतीचे आवाहन करत आहेत. मोदी यांनी जागतिक पद्धतीतं काय करायला हवं ते समजून घ्या
26
40 हून अधिक देशांमध्ये आपत्कालीन उपाय
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या माहितीनुसार, सुमारे 40 देशांनी ऊर्जा बचतीसाठी विशेष नियम लागू केले आहेत. काही देशांनी इंधन रेशनिंग, प्रवास मर्यादा, सरकारी खर्च कपात आणि वीज बचतीच्या मोहिमा सुरू केल्या आहेत.
36
अनेक देशांमध्ये Work From Home सक्तीचे
इंधन बचतीसाठी पाकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांनी वर्क फ्रॉम होम धोरण लागू केले आहे. काही ठिकाणी आठवड्यातील कार्यालयीन दिवसही कमी करण्यात आले आहेत, जेणेकरून प्रवास आणि इंधनाचा वापर कमी होईल.
ऊर्जा बचतीसाठी अनेक देशांनी कार्यालये आणि सार्वजनिक इमारतींमध्ये एसीचे तापमान निश्चित केले आहे. बांगलादेश, सिंगापूर, थायलंड आणि श्रीलंका यांसारख्या देशांनी 24 ते 26 डिग्री सेल्सियसची मर्यादा लागू केली आहे. काही देशांमध्ये सरकारी कार्यालयांत एसी बंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे.
56
इंधन बचतीसाठी वाहतूक नियम कडक
दक्षिण कोरियात odd-even नियम लागू करण्यात आले आहेत, तर श्रीलंकेत QR कोडद्वारे इंधन वितरण सुरू आहे. काही देशांनी सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले असून खासगी वाहनांच्या वापरावर मर्यादा आणल्या आहेत.
66
मोदींच्या 9 महत्त्वाच्या सूचना
पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर, कारपूलिंग, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग्स आणि परदेश दौरे टाळण्याचा सल्ला दिला आहे. इंधन बचत आणि विदेशी चलन वाचवण्यासाठी या उपायांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.