केक खाल्ल्यानंतर मुलीसह संपूर्ण कुटुंबाची प्रकृती खालावली. घरात पाच जण होते. सर्वात लहान मुलीचा जीव वाचला कारण तिने केक खाल्यानंतर उलटी केली होती.
घरात उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण घराला सजविण्यात आले होते. घरात 10 वर्षाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने सगळेच आनंदी होते. वाढदिवसाचा केक कापला गेला आणि त्यानंतर सर्वांनी केक खाल्ला, फुगे फोडले आणि टाळ्या वाजवल्या… पण दुसऱ्या दिवशी अचानक वाढदिवसाचा केक कापणाऱ्या मुलीची तब्येत बिघडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील पटियाला येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
पटियाला येथील मानवी नावाच्या 10 वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाला ऑनलाइन केक ऑर्डर करण्यात आला होता. केक खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून, आयपीसीच्या कलम 273 आणि 304-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या कुटुंबीयांनी वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. केक खाल्ल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यही आजारी पडले. मुलीच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी पोलीस व्हिसेरा रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत.त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. तसेच पुढील तपस देखील त्याप्रमाणे केला जाईल.
मानवी असे या 10 वर्षीय मुलीचे नाव आहे. मानवीच्या आजोबांनी सांगितले की, 24 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता ऑनलाइन केक ऑर्डर केला होता. रात्री 11 च्या सुमारास संपूर्ण कुटुंबाला त्रास होऊ लागला. त्यावेळी घरात पाच जण होते. सर्वात लहान मुलीचा जीव वाचला कारण तिने केक खाल्यानंतर उलटी केली होती, मात्र, 10 वर्षांच्या मानवीने आपला जीव गमावला.
बेकरी मालकावर गुन्हा दाखल:
बेकरी मालकावर ‘निष्काळजीपणाने मृत्यू आणि विषारी अन्न पुरवल्या’च्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 मार्च रोजी मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केकची ऑनलाइन ऑर्डर देण्यात आली होती. कुटुंबीयांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र 10 वर्षीय मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आणखी वाचा :
भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग ;सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश ; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार का ?