आम्हाला पैसे भेटले तर अदानी आणि अंबानी यांच्यावरील टीका थांबवू, काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांच्या वक्तव्याने नवीन वादाला फुटले तोंड

Published : May 12, 2024, 03:44 PM ISTUpdated : May 12, 2024, 04:24 PM IST
Adhir Chowdhury

सार

काँग्रेसचे जेष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी परत एका वादाला तोंड फोडले आहे. आम्हाला पैसे दिल्यास आम्ही अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका करणे थांबवू असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अधीररंजन चौधरी यांच्या 

काँग्रेसचे जेष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी परत एका वादाला तोंड फोडले आहे. आम्हाला पैसे दिल्यास आम्ही अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका करणे थांबवू असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अधीररंजन चौधरी काँग्रेसचा भ्रष्टाचार उघडकीस करण्यात आला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स हँडलवर क्लिप व्हायरल केली आहे. 

चौधरी काय म्हणाले? - 
काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी पुढे म्हटले आहे की, “काँग्रेस नेते आणि अदानींना पैसे पाठवायला सुरुवात केली की, ”काँग्रेस नेत्यांना अंबानी आणि अदानी यांनी पैसे दिल्यास ते बोलायचं बंद करतील. आम्ही त्यांच्यावर टीका करतो, त्यांनी आम्हाला पैसे पाठवल्यास आम्ही आमचे तोंड बंद करू." काँग्रेस नेत्याने पत्रकाराला मुलखात देताना ही माहिती दिली आहे. 

काँग्रेस पक्षाने चौधरी यांना दिली उमेदवारी -
पश्चिम बंगालमधील बहरामपूरमधून काँग्रेस पक्षाने चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून भाजपचे उमेदवार निर्मल कुमार आणि तृणमूल काँग्रेसचे युसूफ पठाण हे निवडणुकीला उभे आहेत. अधीर रंजन कुमार चौधरी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वाद उदभवला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे एकच रंगत उडाली आहे. येथे आता कोण निवडून येतंय ते लवकरच समजून येईल.
आणखी वाचा – 
इस्रायलने गाझावर क्षेपणास्त्रे डागली, रफाहमध्ये बॉम्बचा वर्षाव झाला असून शहर रिकामे करण्याचा दिला इशारा
मुंबई इंडियन्सच्या पराभवावर कर्णधार हार्दिक पांड्याने केले भाष्य, अखेर सांगितले असे सत्य की...

PREV

Recommended Stories

Lionel Messi India Visit : 14 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी भारतात दाखल, ‘GOAT इंडिया टूर 2025’ला भव्य सुरुवात
मेस्सी-मेस्सीच्या घोषणांनी दुमदुमले कोलकाता, रात्री उशिरा पोहोचला GOAT