नववधूने हॉलिवूडमधील गायिका Tylor Swift च्या या गाण्यावर पतीसाठी केला खास डान्स, पाहा VIDEO

Published : Feb 26, 2024, 05:47 PM ISTUpdated : Feb 26, 2024, 05:50 PM IST
bengli brides

सार

सोशल मीडियावर एका बंगाली नववधूने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. खरंतर, एका तरुणीचा तिच्या लग्नातील डान्सचा खास व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तिने हॉलिवूडमधील एका गाण्यावर पतीसाठी स्पेशल डान्स केल्याचे दिसून येत आहे.

Viral Video : हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टची (Tylor Swift) लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली असून तिची गाणे रेकॉर्डब्रेक करत आहेत. भारतातही टेलर स्विफ्टच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. अशातच एका बंगाली नववधूने तिच्या लग्नसोहळ्यावेळी टेलर स्विफ्टच्या एका गाण्यावर पतीसाठी स्पेशल डान्स केला आहे. या डान्सचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत atri.thestoryteller नावाच्या युजरने लिहले की, “आतापर्यंतची सर्वात सुंदर आणि खोडकर नववधूसाठी! तुझा पुढचा प्रवास प्रेमळ, आनंदी-उत्साहित असो.” व्हिडीओमध्ये पाहू शकता की, लाल रंगातील साडीमध्ये बंगाली नववधू फार सुंदर दिसतेय. याशिवाय टेलर स्विफ्टच्या “Love Story” गाण्यावरील तिचा डान्स पाहून सर्वजण आनंदित झालेत. खासकरुन तिचा पती तिला डान्स करताना पाहून खूप खुश झाल्याचे दिसून येत आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
बंगाली नववधूच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, "जेव्हा तुम्ही एखाद्या गाण्याशी मनापासून जोडले जाता तेव्हा तुमच्या भावना फार महत्त्वाच्या असतात. भाषा महत्त्वाची नसते. फार सुंदर." दुसऱ्याने लिहिले की, "मला या गाण्यामागील वेडेपण माहितेय." तिसऱ्याने लिहिले की, "नवऱ्याचे तर आयुष्यच बदलले." नववधूच्या डान्सच्या व्हिडीओला सात लाखांहून अधिक युजर्सने पाहिले आहे.

आणखी वाचा : 

हिमाचलच्या बर्फवृष्टीत योग करतानाचा व्हिडीओ व्हायरल, AI चा चमत्कार असल्याचा युझर्सने केला दावा

मुकेश आणि नीता अंबानी यांनी सून राधिकाला लग्नाआधी दिले हे महागडे गिफ्ट, किंमत ऐकून व्हाल थक्क

जिलेबी तळण्याची ही पद्धत पाहून व्हाल अव्वाक, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!