उत्तराखंडमध्ये लग्नाच्या बसचा भीषण अपघात, सुमारे 25 ते 30 जण ठार झाल्याची शक्यता

उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री लग्नाची बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 25 ते 30 जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री लग्नाच्या मिरवणुकीत निघालेली बस 200 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला. सुमारे 25 ते 30 जण जागीच ठार झाल्याची भीती आहे. मात्र मृतांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही बस हरिद्वारमधील लालधंग येथून पौडी येथील बिरोंखल गावाकडे जात होती. घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड विधानसभेच्या अध्यक्षा रितू खंडुरी घटनास्थळी पोहोचल्या मात्र त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

सिमंदी गावाजवळ रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली. बसमध्ये लग्नाचे 40-50 पाहुणे होते.

वधूच्या घराजवळ झाला अपघात 

वधूच्या घरापासून दोन किमी अंतरावर हा अपघात झाला. बसमधील पाहुणे जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागले, त्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली, त्यानंतर बचावकार्य सुरू झाले. टॉर्च आणि मोबाईल फोनच्या मदतीने सुरू झालेल्या बचावकार्यासाठी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांतील पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

 

Share this article