
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जनपद महामार्गावर कार उभी करून स्टंट करणे एका नव वराला महागात पडले आहे. पोलिसांनी नव वराच्या विरोधात कार्यवाही करत गाडी ताब्यात घेतली. यामुळे नव वराला फुलांनी न सजविलेल्या कारमधून लग्न मंडपापर्यंत जावे लागले. देवबंद क्षेत्राच्या गावातील भायला येथे राहणाऱ्या अंकितची वरात बुधवारी (12 मार्च) कुसावली येथे जात होती.
नक्की काय घडले?
लग्नासाठी शाही थाट आणि फुलांनी सजविलेली कार घेऊन अंकितची वरात लग्न सोहळ्यासाठी निघाली होती. यादरम्यान, अंकितची कार मंसूरपुर येथे पोहोचली असता बस स्टॅण्डजवळील महामार्गावर कार थांबवली. यानंतर अंकित कारवर उभा राहून ड्रोनच्या माध्यमातून फोटो काढू लागला. अशातच पोलिसांनी अंकितला फोटो काढताना पाहिले असता त्याची कार ताब्यात घेतली. कार ताब्यात घेतल्याने दुसऱ्या कारची घरातील मंडळींनी व्यवस्था केली.
उत्तर प्रदेशातील मंसूरपुर पोलीस स्थानकाचे अधिकारी आशुतोष कुमार सिंह यांनी म्हटले की, एक्सयुव्ही 500 कार चंदीगड येथे राहणाऱ्या संदीप सिंह यांचा मुलगा संतोष सिंह याची होती, ती आम्ही ताब्यात घेतली. यामुळे नव वराला फुलांनी न सजविलेल्या कारमधून जावे लागले.
आणखी वाचा :
कर्नाटकात फ्लॉवर मंच्युरिअन आणि कॉटन कँडीवर बंदी, आरोग्यासाठी हानिकारक असल्याने सरकारने घेतला निर्णय
सैन्याचा हा कुत्रा शत्रूला युद्धात हरवणार, जो बर्फ, वाळवंट आणि पर्वतांमध्ये सैन्याला करेल मदत
एलॉन मस्कच्या एका पोस्टने खळबळ उडवून दिली! X वर कोणते फीचर्स लॉन्च करणार?