उत्तर प्रदेश ATS ची मोठी कारवाई, ISI एजंटला मेरठमध्ये अटक

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) रविवार 4 फेब्रुवारी 2024 रोजी मेरठ येथून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या एजंटला अटक केली.

vaidehi raje | Published : Feb 4, 2024 11:00 AM IST / Updated: Feb 04 2024, 04:39 PM IST

UP ATS Arrested Pakistani ISI agent मेरठ: उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) रविवार 4 फेब्रुवारी 2024 रोजी मेरठ येथून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या एजंटला अटक केली. सदर व्यक्ती  रशियातील मॉस्को येथील भारतीय दूतावासात काम करत होती.

सत्येंद्र सिवाल असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. तो परराष्ट्र मंत्रालयात एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ) म्हणून काम करत होता. त्याच्यावर आयएसआयसाठी काम केल्याचा आरोप आहे. सत्येंद्र हा मूळचा हापूर, यूपीचा असून मॉस्को येथील भारतीय दूतावासात काम करत होता.

यूपी एटीएसला सत्येंद्रबाबत गुप्त माहिती मिळाली

यूपी एटीएसने एक प्रेस नोट प्रसिद्ध करून सांगितले की, त्यांना सत्येंद्रबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. आयएसआयचे हँडलर हे भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून भारतीय लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती घेत असल्याचे उघड झाले आहे. या माहितीच्या अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता, सत्येंद्र आयएसआयशी संबंधित असल्याचे उघड झाले.

या माहितीच्या जोरावर युपी एटीएसने मोठी कारवाई करत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय एजंट सतेंद्रला मेरठमधून अटक केली आहे. या आयएसआय हँडलर्सवर भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी संस्थेची महत्त्वाची गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप आहे. एटीएसच्या पथकाने त्याच्याकडून 2 मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत. युपी एटीएस त्याची अधिक चौकशी करत आहे.

पैशाच्या लालसेपोटी केली आयएसआयशी हातमिळवणी

सत्येंद्रने पैशाच्या लालसेपोटी भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती आयएसआयला दिली. एटीएस फील्ड युनिट मेरठमध्ये बोलावून सत्येंद्रची सखोल चौकशी करण्यात आली. एटीएसला मिलेल्या माहितीच्या जोरावर चौकशी केली असता सत्येन्द्रने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. परंतु अधिकाऱ्यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

सत्येंद्र 2021 पासून मॉस्को दूतावासात तैनात होता. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, तो भारतीय लष्कर आणि त्याच्या दैनंदिन कामकाजाची माहिती काढण्यासाठी भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना पैश्यांची लाच देत असे. त्याच्यावर भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहारांबद्दलची महत्त्वाची आणि गोपनीय माहिती ISI हँडलर्सला पुरवल्याचा आरोप आहे.

यापूर्वीही अशा अनेकांना अटक करण्यात आली आहे

आयएसआय किंवा पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेक लोकांना युपी एटीएसने  यापूर्वीही अटक केली आहे. गेल्या वर्षीच युपी एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून हापूर आणि गाझियाबाद येथून दोन व्यक्तींना अटक केली होती.

आणखी वाचा -

तुमचे स्वप्न हा माझा संकल्प,त्यात कोणतीही कसर सोडणार नाही-पंतप्रधान मोदी

US-UK चा येमेनमधील हुथींच्या 36 स्थानांवर हल्ला, लाल समुद्रातील 3 जहाजांवर केली कारवाई

UPI Goes Global : फ्रान्समध्ये यूपीआय प्रणाली लाँच, भारतीय प्रवाशांना पेमेंट करणे होणार सोपे

Share this article