केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज (रविवारी, ३१ जानेवारी २०२६) अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा ९ वा अर्थसंकल्प आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. जाणून घ्या कोणकोणत्या घोषणा केल्या.

05:18 PM (IST) Feb 01
बायोफार्मा शक्ती योजना: बजेट २०२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. बायोफार्मा शक्ती योजनेअंतर्गत कर्करोग, मधुमेह आणि ऑटोइम्यून डिसऑर्डरची औषधे स्वस्त होतील. जाणून घ्या या योजनेचे फायदे.
12:27 PM (IST) Feb 01
शेअर मार्केटच्या निर्देशांकात ८०० अंशांची तर निफ्टीमध्ये ३०० अंकांची घसरण झाली आहे. सध्या अर्थमंत्री निर्मला सीतारण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
12:24 PM (IST) Feb 01
12:18 PM (IST) Feb 01
शेअर मार्केटमधील ऑप्शन ट्रेडिंगवरच्या करात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये घसरण झालेली पहायला मिळत आहे.
12:11 PM (IST) Feb 01
क्लाऊड सर्विसेस देणाऱ्या परदेशी कंपन्यांसाठी २०४७ पर्यंत करमुक्तीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
12:07 PM (IST) Feb 01
टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नव्हे तर दंड ठोठावला जाणार आहे. याशिवाय अषोघित संपत्तीसाठी देखील हाच नियम लागू असेल.
12:05 PM (IST) Feb 01
आयटीआर रिर्टन ३१ जुलैपर्यंत दाखल करू शकणार असल्याचे अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
12:02 PM (IST) Feb 01
नव्या इन्कम टॅक्सची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून करणार आहेत. तर अपघात विम्यावर मिळणाऱ्या रक्कमेवर कोणताही टॅक्स लावला जाणार नाहीये.
11:58 AM (IST) Feb 01
पुढल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या ४.३ टक्के राहिल असा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला आहे. तर चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ४.४ टक्के राहिल असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
11:51 AM (IST) Feb 01
लखपती दीदी बनवण्यामागे नवी पावले टाकणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच दिव्यांगजनांना अधिक सक्षम बनवण्यासाठी दिव्यांग सहारा योजना राबवली जाणार आहे.
11:46 AM (IST) Feb 01
दशकभरासाठी खलो इंडिया मिशनी अर्थमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली आहे. या मिशनद्वारे क्रीडा क्षेत्राचे रुप बदलून टाकण्यासह नवी क्रीडा संकुले उभारली जाणार आहेत.
11:43 AM (IST) Feb 01
कंटेंट क्रिएशन लॅब (Content Creation Lab) भारतातील अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्रात २०३० पर्यंत सुमारे २० लाख (२ मिलियन) व्यावसायिकांची गरज भासण्याची शक्यता आहे.हे उद्दिष्ट लक्षात घेऊन, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज' (मुंबई) च्या सहकार्याने देशभरातील १५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये 'AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स' स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
11:41 AM (IST) Feb 01
देशात सात हाय स्पीड कॉरिडोअर उभारले जाणार आहे. याचा मार्ग मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरु, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरु, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुरी असा असणार आहे.
11:39 AM (IST) Feb 01
आयुर्वेदाचे शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था स्थापन करणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.तर पशूवैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य करणार आहेत. सोबतच आयुर्वेदाचे शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
11:23 AM (IST) Feb 01
५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढवण्यासह त्यासाठी फंडाची स्थापना करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच १२.२ लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरले जाणार आहेत.
11:19 AM (IST) Feb 01
वस्रोद्योग आणि हस्तकला उद्योगाला चालना देण्यासग हातमागासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज्य अभियान राबणार आहे. याशिवाय मेगा टेक्ससाइलची उभारणी करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
11:15 AM (IST) Feb 01
बायोफार्मा शक्तीसाठी १० हजार कोटींची तरतूद करत आहोत असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे. याशिवाय तीन मोठ्या केमिकल पार्कची स्थापन करणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
11:12 AM (IST) Feb 01
मधुमेह, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी स्वस्त औषधे उपलब्ध करू असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे.
11:10 AM (IST) Feb 01
२०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "आम्ही १२ वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यापासून, देशाच्या आर्थिक वाटचालीत स्थिरता, वित्तीय शिस्त, शाश्वत वाढ आणि मध्यम महागाई दिसून आली आहे. अनिश्चितता आणि अडथळ्यांच्या काळातही आम्ही घेतलेल्या जाणीवपूर्वक निर्णयांचा हा परिणाम आहे."
10:58 AM (IST) Feb 01
केंद्रीय मंत्रीमंडळाकडून अर्थसंकल्प २०२६-२७ ला मंजूरी मिळाली आहे.
10:43 AM (IST) Feb 01
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, 'मला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा नाहीत'. तर सपा खासदार राम गोपाल यांनीही देखील तशीच प्रतिक्रिया दिली आहे.
09:52 AM (IST) Feb 01
अर्थमंत्री निर्मला सीतारमण संपूर्ण टीमसह संसदेत दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करणार आहेत.
08:55 AM (IST) Feb 01
आज संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यासापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण कर्तव्य भवनात दाखल झाल्या आहेत .
08:45 AM (IST) Feb 01
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी, आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला, ज्यामध्ये भारताच्या ७.४% GDP वाढीचा अंदाज आणि प्रभावी महागाई व्यवस्थापनावर प्रकाश टाकण्यात आला.
08:44 AM (IST) Feb 01
दरवर्षी अर्थसंकल्पाचा दिवस आला की, “अर्थसंकल्प सादर झाला... पण त्यात नेमकं काय आहे?” असा गोंधळ सामान्य लोकांमध्ये उडतो.
08:43 AM (IST) Feb 01
सुनिधी सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ५४.१ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे, ज्यात ७.९ टक्के वार्षिक वाढ अपेक्षित आहे.
08:43 AM (IST) Feb 01
2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले होते? 2026 चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एकदा उजळणी करूया...
08:28 AM (IST) Feb 01
आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासाठी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी अर्थ मंत्रालयासाठी आपल्या निवासस्थानातून रवाना झाले आहेत.
07:48 AM (IST) Feb 01
१ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटशी संबंधित काही रंजक आणि अनोख्या गोष्टी येथे सांगितल्या आहेत. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. तत्पूर्वी अर्थसंकल्पाबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घ्या.
07:46 AM (IST) Feb 01
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 साठी तुमचे अंतिम मार्गदर्शक: वित्तीय तूट, कॅपेक्स, GST, PSU, रेपो रेट, सबसिडी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारे कर यांसारख्या महत्त्वाच्या संज्ञा A-Z पर्यंत समजून घ्या.
07:45 AM (IST) Feb 01
FY25 साठी, करदात्यांना जुनी कर प्रणाली (जास्त दर पण अनेक वजावटी) आणि नवी कर प्रणाली (कमी स्लॅब, मर्यादित वजावटी, स्टँडर्ड डिडक्शन आणि मोठी सवलत) यापैकी एक निवडण्याचा पर्याय होता.
07:11 AM (IST) Feb 01
06:56 AM (IST) Feb 01
06:38 AM (IST) Feb 01
Why Pakistan presents its budget in June : भारतात दरवर्षी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो, पण तुम्हाला माहित आहे का की पाकिस्तान आपला अर्थसंकल्प कधी सादर करतो? आपला शेजारी देश जूनमध्ये अर्थसंकल्प सादर करतो. चला जाणून घेऊया का?
06:10 PM (IST) Jan 31
Union Budget 2026: जागतिक भू-राजकीय तणावात आणखी वाढ झाली असून, नवीन व्यापारी स्पर्धा आणि अमेरिकेच्या आक्रमक टॅरिफ धोरणाच्या पुनरागमनामुळे व्यापार युद्धांची भीती पुन्हा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे.
05:07 PM (IST) Jan 31
यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार असल्याने शेअर मार्केट सुरु राहणार आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींच्या काळात १९९९ मध्ये रविवारी अर्थसंकल्प सादर झाला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषण सादर करतील.
04:08 PM (IST) Jan 31
Union Budget 2026 : या वर्षाच्या अखेरीस पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि आसाम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांसाठी क्षेत्रांनुसार निधी वाटप आणि विकास-केंद्रीत घोषणांवर विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे.
03:28 PM (IST) Jan 31
Budget 2026 Watch LIVE : 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पुन्हा एकदा पेपरलेस बजेट सादर करतील. तुम्ही तुमच्या फोनवर एका ॲपद्वारे संपूर्ण बजेट पाहू शकाल. जाणून घ्या मोबाईलवर बजेट कसे मिळेल? कोणते ॲप डाउनलोड करावे लागेल?
03:10 PM (IST) Jan 31
Budget 2026 Halwa Ceremony : बजेट सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात 'हलवा समारंभ' साजरा केला जातो, ही एक जुनी परंपरा आहे. या कार्यक्रमानंतर, बजेट तयार करणारे अधिकारी बजेट सादर होईपर्यंत मंत्रालयातच राहतात, जेणेकरून कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही.