VIRAL VIDEO : हा ट्रक चालक सोशल मीडियावर आहे लोकप्रिय, पाककलेमुळे झाला आहे Youtube स्टार

Published : Dec 29, 2023, 06:12 PM ISTUpdated : Dec 29, 2023, 06:32 PM IST
r_rajesh_07

सार

Truck Driver Rajesh : ट्रक चालक राजेश यांचे 'Daily Vlogs of Indian Truck Driver' या नावाने यु-ट्यूब चॅनेल आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कामानिमित्त प्रवास करत ते पाककला आपल्या प्रेक्षकांना दाखवत असतात. 

Truck Driver Rajesh : सोशल मीडिया म्हणजे गाव-खेड्यापासून ते देशपरदेशातील सर्वसामान्य मंडळींना स्वतःमधील कौशल्य दाखवण्यासाठी मिळालेले हक्काचे व्यासपीठ. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील कंटेंट क्रीएटर्संमध्ये कमालीचे बदल घडल्याचे दिसत आहे. 

याच लोकप्रिय कंटेंट क्रीएटर्सच्या यादीमध्ये ट्रक चालक राजेश यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्या पाककलेच्या व्हिडीओंना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

ट्रक चालक राजेश यांचे साध्या शैलीतील व्हिडीओ कोणाचेही लक्ष वेधून घेतील, असेच आहेत. ट्रक चालक राजेश यांचे इंस्टाग्रामवर 419 हजार फॉलोअर्स आहेत आणि YouTube वर 1.21 दशलक्ष इतक्या संख्येमध्ये सबस्क्राइबर्स आहेत. राजेश यांच्या व्लॉगमधील कंटेट पाहाल तर आपणही त्यांचे नक्कीच कौतुक कराल.

एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ

'Daily Vlogs of Indian Truck Driver' असे राजेश यांच्या यू-ट्युब चॅनेलचे नाव आहे. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राजेश ट्रक चालकांचे दैनंदिन जीवन आणि राज्या-राज्यांमधील लांब पल्ल्याचे प्रवास, वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देतात. त्यांचे व्लॉग केवळ रस्तेमार्ग किंवा एखाद्या ठिकाणांबाबत मर्यादित नाहीत, तर प्रवासादरम्यान ते आपली पाककला देखील प्रेक्षकांना दाखवतात. आपल्या ट्रकच्या केबिनमध्येच ते स्वयंपाक करतात आणि तेथेच पदार्थांचा आस्वादही घेतात.

लक्ष वेधून घेणारे व्हिडीओ

ट्रकने प्रवास करून हैदराबादमध्ये पोहोचलेल्या राजेश यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती. त्यांच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांकडून लाइक व कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला. राजेश यांनी आपल्या यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेले प्रत्येक व्हिडीओ लक्ष वेधून घेणार आहेत.

VIDEO : राजेश यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

आणखी वाचा

Zero Rupee Note : शून्य रूपयाची नोट का छापण्यात आली? जाणून घ्या संपूर्ण कहाणी

VIRAL VIDEO : पोलीस अधिकाऱ्याने गायलं अ‍ॅनिमल सिनेमाचे गाणे, सुरेल आवाज ऐकून लोक म्हणाले - ‘तुम्ही बॉलिवूडमध्ये असायला हवे’

Inspirational Story : धीरूभाई अंबानींचे संपूर्ण कुटुंब 1BHK फ्लॅटमध्ये राहते होते, पगार होता केवळ 300 रुपये

PREV

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!