गोव्याची नाईट लाईफ जगप्रसिद्ध आहे. पण, सुरक्षित आणि विश्वासार्ह क्लब निवडण्याची काळजी घ्या.
गोव्यात फिरण्यासाठी तुम्ही वाहन भाड्याने घेऊ शकता. दिवसा स्कूटर आणि रात्री कार वापरणे अधिक सुरक्षित आहे.
तुम्ही राहत असलेले हॉटेल निर्जन ठिकाणी नसावे. यासाठी बुकिंग करण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की तपासा.
ऑफलाइन मॅप, लोकल सिम, पोर्टेबल वाय-फाय आणि पॉवर बँक नेहमी सोबत ठेवा. रेंजची समस्या आल्यास इतरांशी संपर्क साधण्यासाठी हे उपयुक्त ठरते.
तुमचे प्रत्येक दिवसाचे प्लॅन्स जवळच्या मित्रांना किंवा घरच्यांना सांगणे चांगले राहील.
एखादे ठिकाण निवडण्यापूर्वी तेथील स्थानिक संस्कृती, नियम आणि हवामानाबद्दल माहिती गोळा करा.
छोट्या जखमा किंवा भाजल्यास तात्पुरत्या आरामासाठी फर्स्ट-एड किट सोबत ठेवा.
Marathi Desk 1