Sharad Pawar | Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार शरद पवारांची माफी मागणार?

Published : Nov 29, 2026, 02:04 PM IST

शरद पवारांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिला नाही, तर त्यांच्या पायावर डोकं ठेवून जाहीर माफी मागणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. प्रसंगी राजकारण सोडण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली. २०११ च्या जनगणनेनुसार पुनर्रचना केल्यास अनुसूचित जाती-जमातींवर अन्याय होईल, असा दावा करत विद्यमान ५४३ जागांमध्ये महिला आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस नेते पवारांना विधेयकाला विरोध करण्याची विनंती करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. इंडिया आघाडीच्या बैठकीतील मित्रपक्षांची उपस्थिती आणि राहुल गांधींच्या भूमिकेबाबतही त्यांनी माहिती दिली.