२०२९ मध्ये लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. २०२३ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेच्या तरतुदीला विरोधकांनी एकमताने मान्यता दिली होती, असे त्यांनी सांगितले. आता विरोधकांचा विरोध पुनर्रचनेला नसून महिला आरक्षणाला असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षण विधेयक वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवल्याबद्दलही त्यांनी विरोधकांवर टीका केली.