अनुचित प्रकारापासून ते धक्कादायक घटनांपर्यंत, वाचा 18 ऑगस्टच्या टॉप 10 बातम्या

Published : Aug 18, 2024, 08:13 PM IST
Marathi daily Top News 1

सार

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत नारायणगावात काळे झेंडे दाखवण्यात आले. तर, श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच, बेंगळुरूमध्ये एका तरुणीवर ऑटोचालकाने बलात्कार केल्याची  घटना घडली.

  1. अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत अनुचित प्रकार, आशा बुचके आक्रमक; नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत नारायणगाव येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांनी आंदोलन केले असून त्यांची प्रकृती खालावली आहे.

2. मराठ्यांनी आरक्षण मागावे का?, संभाजी भिडेंचा सवाल; बांगलादेश हिंसाचाराला विरोध

श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

3. जरांगेंच्या नाशिक रॅलीवरून भुजबळांचा हल्लाबोल, म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमधील शांतता रॅलीवरून छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंकडे आता कोणी लक्ष देत नाही असा दावा भुजबळांनी केला आहे. तसेच, जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात आणि मुख्यमंत्री व्हावे असा टोलाही त्यांनी लगावला.

4. गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाईट वापरावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

गणेशोत्सवात डिजे आणि लेझर लाईटच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले आहेत. याचिकेत ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले होते.

5. लाडकी बहिण योजनेवर मोठी अपडेट!, ऑगस्टमध्ये अर्ज केल्यास पैसे कधी मिळणार?

माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट महिन्याचे एकत्रित ३००० रुपये राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात जमा झालेत. मात्र ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.

 6. बुलंदशहरमध्ये भीषण अपघात, बस आणि पिकअपची टक्कर; 10 जणांचा मृत्यू

यूपीच्या बुलंदशहरमध्ये रविवारी एका भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. बस आणि मॅक्स पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

7. धक्कादायक बातमी, बेंगळुरूमध्ये रात्री ऑटोचालकाने तरुणीवर केला बलात्कार

बेंगळुरूमध्ये एका तरुणीवर ऑटोचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला कोरमंगला येथून ऑटोने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

8. आरजी कार मेडिकल कॉलेज प्रकरण: खासदारावर करण्यात आले गंभीर आरोप

आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून टीएमसी खासदार सुखेंदू शेखर रे यांना कोलकाता पोलिसांनी समन्स बजावले आहे. रे यांनी तपासावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

9. महिलांची रात्रीची ड्युटी लावली जाणार नाही, बंगाल सरकारचे आदेश

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका आईने आपल्या मुलाच्या जिद्दीपुढे हार मानून त्याला महागडा आयफोन घेऊन दिला आहे. व्यवसायाने फुले विकणाऱ्या महिलेचा मुलगा अनेक दिवसांपासून आयफोन खरेदी करण्याची मागणी करत होता.

10. जम्मू-काश्मीर निवडणूक: भाजपची रणनीती काय?, अपक्षांसोबत युती?

जम्मू-काश्मीरातील विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती न करता अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची रणनीती आखली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी काश्मीर खोऱ्यातील 8 ते 10 अपक्ष उमेदवारांसोबत निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Parliament Winter Session : वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा; PM मोदी दुपारी १२ वाजता सुरुवात करणार, नक्की काय आहे वाद घ्या जाणून
IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द