
Humayun Tomb complex dome collapse: दिल्लीतील हुमायूनच्या कबर संकुलाचा घुमट शुक्रवारी कोसळला. या दुर्घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक अडकल्याची भीती आहे. ही कबर दिल्लीतील निजामुद्दीन भागात आहे. मुघल सम्राट हुमायूनचे स्मारक १६ व्या शतकाच्या मध्यात बांधण्यात आले होते. ही कबर देश आणि जगातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील निजामुद्दीन भागात मुघल सम्राट हुमायूनच्या थडग्याचा एक भाग कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच, अग्निशमन दल आणि बचाव पथके तात्काळ रवाना करण्यात आली. दिल्ली अग्निशमन दलाने सांगितले की, सायंकाळी ४:३० वाजता आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काही लोक अडकल्याची भीती आहे. बचाव कार्य सुरू आहे.