सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' गुरुवारी (21 डिसेंबर) सकाळी जवळपास 10.30 वाजल्यापासून डाऊन आहे. यामुळे त्रस्त झालेल्या युजर्संकडून तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.
X Platform News : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' पुन्हा एकदा डाऊन झाले आहे. जगभरातील युजर्संना यामुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे. 'X' प्लॅटफॉर्म लॉग इन केल्यानंतर पेजवर कोणतीही माहिती दिसत नाहीय तसेच टाइमलाइनवर कोणत्याही पोस्ट दिसत नाहीत. या समस्येमुळे युजर्स त्रस्त झाले आहेत.
वेबसाइट आणि अॅप या दोन्हीही ठिकाणी युजर्संना समस्येचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावरही Twitter Down हा हॅश टॅग वापरून युजर्स X प्लॅटफॉर्म ठप्प झाल्याची माहिती शेअर करत आहेत.
युजर्सकडून तक्रारींचा पाऊस
मोठ्या संख्येने युजर्सकडून याबाबत तक्रार करण्यात आली आहे. Downdetector वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लेटफॉर्म गुरुवारी (21 डिसेंबर 2023) सकाळी जवळपास 10.30 वाजल्यापासून डाऊन आहे.
यामुळे कामात येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करणाऱ्या युजर्संकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. जवळपास 64 टक्के युजर्सकडून अॅप तर 30 टक्के युजर्संकडून वेबसाइट डाऊन असल्याचे तक्रार केली आहे.
यापूर्वीही डाऊन झाले आहे ‘X’
‘X’ (ट्विटर) डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही मार्च महिन्यामध्ये युजर्संना अशाच पद्धतीचा सामना करावा लागला होता. त्यावेळेसही ’X’ प्लॅटफॉर्म पूर्णपणे ठप्प झाले होते. यामुळे युजर्संना आपली टाइमलाइन दिसत नव्हती. अपडेटेड पोस्टही युजर्स पाहू शकत नव्हते. दरम्यान काही तासांनंतरही या प्लॅटफॉर्मवरील बिघाड दुरुस्त करण्यात आला.
आणखी वाचा
Savitri Jindal : देशातील सर्वात श्रीमंत महिला, कमाईमध्ये अंबानी-अदानींनाही सोडले मागे
Exclusive : रामसेवेसाठी संपूर्ण जीवन केले समर्पित, सरकारी नोकरीही गमावली! जाणून या रामभक्ताची कहाणी