स्वाती मालिवाल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये वैयक्तिक सुरक्षा गार्ड दिसून आले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी वैयक्तिक सुरक्षा गार्ड स्वाती यांना घराबाहेर घेऊन येताना दिसत आहेत.
स्वाती मालिवाल प्रकरणावरून रोज वेगवेगळे खुलासे होत असून अनेक किस्से समोर येताना दिसून येत आहेत. त्यांच्यावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी मारहाण करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला होता. स्वाती यांनी केजरीवाल यांचे पीए बीभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. त्यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप स्वाती यांनी केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल -
सोशल मीडियावर स्वाती मालिवाल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये स्वाती या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांशी वाद घालताना दिसून आल्या आहेत. आज आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला सुरक्षारक्षक स्वाती मालिवाल याना बाहेर आणत आहेत. त्यामध्ये बाहेर आल्यानंतर स्वाती या सुरक्षारक्षकाचा हात झटकतात आणि पोलिसांशी रस्त्यावर संवाद साधताना दिसून आले आहे.
स्वाती मालिवाल यांनी एफआयआरमध्ये काय केला आरोप -
स्वाती मालिवाल यांनी एफआयआर दाखल केली असून यामध्ये आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, विभवने मला बाहेर काढले. मी जखमी झाल्यामुळे मला चालता येत नव्हते. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन झाल्याचे दिसत नाही. महिला सुरक्षा कर्मचारी हळूहळू घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे/. त्यांसोबत कोणीही पुरुष नाही. स्वाती मालिवाल यांनी विभव यांच्यावर आरोप केले असून आपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
आणखी वाचा -
काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमार प्रचार करत असताना झाला हल्ला, हल्लेखोरांनी व्हिडीओ जारी करून केले समर्थन
दिल्ली मद्य उत्पादन शुल्क मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख आरोपी, ईडीने केले आरोपपत्र तयार