
दिल्लीमध्ये काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या विरोधात लढत असून या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे. कन्हैय्या कुमारवर शनिवारी हल्ला करण्याच्या आधी हल्लेखोराने हार घातला आणि शाई फेकून चापटी मारल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
हल्लेखोर कोण आहेत?
कन्हैय्या कुमारला मारहाण करणाऱ्या मारेकऱ्यांना तेथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. कन्हैय्या कुमारला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे दक्ष चौधरी आहे. हे मारहाणीचे प्रकरण झाल्यानंतर दक्ष चौधरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दक्ष चौधरी बोलतो की, "ज्या कन्हैयाने भारताचे तिकडे व्हायला हवे असे म्हटले होते, अफजल, तुझे हत्यारे जिवंत असून आम्ही शरमिंदा आहोत, आम्ही दोघांनीही त्याला थप्पड मारून प्रत्युत्तर दिले." दक्ष चौधरी पुढे म्हणा ला की, जोपर्यंत आमच्यासारखे सनातनी जिवंत आहेत, तोपर्यंत भारताचे कोणी तुकडे करू शकत नाही. दक्ष चौधरीसोबत उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याला (कन्हैया कुमार) दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. जो भारतीय सैनिकांना बलात्कारी म्हणतो.
मारहाणीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्धाला सुरुवात -
कन्हैय्या कुमारवर हल्ला केल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी यावेळी बोलताना दक्ष चौधरीचे भाजप नेत्यांसोबत फोटो असल्याचा मुद्दा उचलून धरला आहे. हा हल्ला भाजपनेच घडवून आणल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. त्यांच्या या आरोपाला भाजप कसे लक्ष करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा -
काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमार प्रचार करत असताना झाला हल्ला, हल्लेखोरांनी व्हिडीओ जारी करून केले समर्थन
दिल्ली मद्य उत्पादन शुल्क मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख आरोपी, ईडीने केले आरोपपत्र तयार