Swachh Survekshan : देशातील सुरत आणि इंदूर सर्वाधिक स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या ठिकाणांचाही समावेश

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्व्हेमध्ये इंदूर आणि सुरत शहराने बाजी मारली आहे. देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये या दोन शहरांनी आपले नाव कोरले आहे. इंदूरला सातत्याने सातव्या वेळेस देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे.

Swachh Survekshan : केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्व्हेमध्ये मध्य प्रदेशातील इंदूर आणि गुजरातमधील सुरत शहराने बाजी मारली आहे. इंदौरला सातत्याने सातव्या वेळेस देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे.

केंद्र सरकारचा स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 पुरस्कार
देशातील सुरत (Surat) आणि इंदूरला (Indore) केंद्राच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 मध्ये 'अखिल भारतीय स्वच्छ शहर' म्हणून पहिले रँकिंग देण्यात आले आहे. इंदूरने सातत्याने सातव्या वेळेस पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.

सुरतने, स्वच्छतेप्रति समर्पण आणि स्वच्छ-हरित शहराच्या प्रयत्नासाठी राष्ट्रीय मानक स्थापन केले आहे. स्वच्छता अभिनायात नवी मुंबईनेही (Navi Mumbai) बाजी मारत 'अखिल भारतीय स्वच्छ शहर' म्हणून तिसरा रँक मिळवला आहे. नवी मुंबईत स्वच्छतेबद्दल येणाऱ्या काळातही अधिक उत्तम स्वच्छता केली जाईल अशी अपेक्षा केली जात आहे.

 

या शहरांचाही समावेश
एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीत पुण्याजवळील सासवडने (Saswad) स्वच्छ आणि निरोगी राष्ट्राच्या दृष्टीकोनात योगदान दिले आहे. यामुळे अखिल भारतीय स्वच्छ शहर म्हणून सासवडला पहिला रँक मिळाला आहे. याशिवाय नेपाळमधील पाटनला (Patan) अखिल भारतीय स्वच्छ शहर म्हणून दुसरा रँक देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लोणावळ्याला (Lonavala) तिसरा रँक देण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ज्याला MHOW म्हणूनही ओखळले जाते. येथील छावणी बोर्डाला सर्वाधिक स्वच्छ छावणी बोर्डाच्या रुपात ओळख मिळाली आहे. दुसऱ्या बाजूला चंदीगडला (Chandigarh) सुरक्षित आणि स्वच्छ शहरासाठी स्वच्छ सर्व्हेक्षण 2023मध्ये 'सर्वश्रेष्ठ सफाई मित्र सुरक्षित शहरा'चा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय गंगा नदीच्या किनाऱ्यावरील स्वच्छतेचे महत्त्व ओळखत वाराणसी आणि प्रयागराजने स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 मध्ये सर्वाधिक स्वच्छ गंगा शहराच्या रुपात शीर्ष स्थान मिळवले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली खास पोस्ट : 

 

आणखी वाचा : 

Lok Sabha Election : भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी ठरवली जातेय रणनिती, पक्ष लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

शेफ मनोहर राम मंदिरासाठी तयार करणार सात हजार किलोंचा 'Ram Halwa'

IndiGoकडून भाडेवाढ, प्रवाशांना या सीट्ससाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क

Share this article