Lok Sabha Election : भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी ठरवली जातेय रणनिती, पक्ष लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024साठीचे बिगुल वाजले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी तयारी करण्यास लागला आहे. अशातच, भाजप पक्षाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Lok Sabha Election : भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी तयारी सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी उमेदावारांच्या नावांचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचेही बोलले जात आहे. तर काही नावांवर अद्याप विचार सुरू असल्याचेही सांगितले जातेय. आताची सर्वात मोठी अपडेट अशी की, भाजपकडून (BJP) लवकरच आगामी निवडणूकीसाठी उमेदावरांच्या नावाची यादी जाहीर केली जाऊ शकते.

लोकसभा निवडणूक 2024साठी भाजपची रणनिती
देभरात राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणूकीसाठी तयारी केली जात आहे. यादरम्यान भाजप पक्षाकडूनही निवडणूकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सार्वजनिक मंचावर सातत्याने म्हणतात की, तिसऱ्यांही त्यांचेच सरकार येईल.

दुसऱ्या बाजूला रॅलीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी लाट येण्याबद्दल बोलत आहेत. राजकीय सूत्रांनुसार, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जानेवारी महिन्यातच जाहीर केली जाऊ शकते. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर भाजप पक्ष लोकसभा निवडणूकीसाठी वेगाने तयारी करण्यास सुरुवात करेल हे देखील बोलले जात आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पार पडू शकते. रिपोर्ट्सनुसार, पहिल्या उमेदावार यादीत दीडशेपेक्षा अधिक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठून लढणार निवडणूक?
भाजप पक्षाच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची लोकसभा निवडणूक वाराणसी येथून लढवणार आहेत. वाराणसीशिवाय पंतप्रधान पूर्व उत्तर प्रदेशासह बिहार, मध्य प्रदेशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील.

भाजप पक्ष लोकसभा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार व्यतिरिक्त पंजाब, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक राज्यातूनही अधिकाधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, भाजपकडून 70 वर्षावरील उमेदवारांना तिकीट दिले जाणार नसल्याचेही ठरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पूर्ण लक्ष हे तरुणांवर आहे. याशिवाय पक्षाकडून लोकसभा निवडणूकीसाठी महिलांना अधिकाधिक तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा :

IndiGoकडून भाडेवाढ, प्रवाशांना या सीट्ससाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क

PM Modi Lakshadweep Visit : जगभरात इंटरनेटवर लक्षद्वीपबद्दल करण्यात आले सर्वाधिक सर्च, मोडला 20 वर्षांचा रेकॉर्ड

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा देशभरातील नागरिकांना पाहाता येणार? BJPकडून केली जातेय खास तयारी

Share this article