पुणे विकासासाठी मोठा निधी जाहीर | Sunetra Pawar | Pune | Development

Published : May 15, 2026, 06:00 PM IST

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर सुनैत्रा पवार यांनी जिल्ह्यातील विकासकामांबाबत मोठी माहिती दिली. पुणे ग्रँड टूरिझम प्रकल्प, भीमाशंकर विकास आराखडा, सिंहगड किल्ला विकास आणि संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आवाहनानुसार ऑनलाइन बैठका घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील पाणीटंचाई, एल निनोचा धोका आणि विकासकामांच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी भूमिका मांडली.