
न्यूयॉर्क: न्यूयॉर्कमध्ये बुधवारी भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने भारतीय संघाला 111 धावांचे लक्ष्य दिले. जवळपास 15 षटकांचा सामना अतिशय स्पर्धात्मक होता. परिस्थिती अशी होती की 30 चेंडूत 35 धावांचे लक्ष्य होते. अशा स्थितीत विजय खूपच आव्हानात्मक वाटत होता. पण भारतीय फलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करत अनेक चौकार आणि षटकार मारले. त्यामुळे भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. यासह भारत टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये सामील झाला आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील शानदार सामना
T20 विश्वचषक 2024 न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारी भारत आणि अमेरिका यांच्यात शानदार सामना झाला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याऐवजी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करत 110 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 110 धावांचे लक्ष्य दिले.
विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला
भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता बाद झाला. टी-२० विश्वचषकात असे पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे. विराट खाते न उघडताच बाद झाला. अमेरिकन गोलंदाज आणि भारतीय वंशाचा सौरभ नेत्रावलकरने ही विकेट घेतली आहे. हा सामना खूपच संघर्षपूर्ण होता. टीम इंडियाच्या खूप विकेट्स शिल्लक होत्या. पण 15 ओव्हर्सपर्यंत रनरेट खूपच कमी होता. पण 16व्या षटकानंतर संघाने चांगली कामगिरी करत धावा केल्या. त्यामुळे 76 धावा झाल्यानंतर एकामागून एक चौकार आणि षटकार मारत धावा कधी 100 च्या पुढे गेल्या हे कळलेच नाही आणि 20 षटकं संपण्यापूर्वीच टीम इंडियाचा विजय झाला.
आणखी वाचा :