जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी चार दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहेत. या दहशतवाद्यांबद्दल अधिक माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही दिले जाईल अशी घोषणाही करण्यात आली आहे.
Jammu-Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी (12 जून) डोडा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यांमधील चार दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहे. याशिवाय दहशतवाद्यांची माहिती दिल्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल अशी घोषणाही पोलिसांकडून करण्यात आली आहे. मंगळवारी (11 जून) दहशतवाद्यांनी भद्रवाहच्या चतरगल्ला येते चार राष्ट्रीय राइफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला. यानंतर बुधवारी जिल्ह्यातील गंडोह परिसरातील तपास दलावर हल्ला केला असता एका पोलीस कर्मचाऱ्यासह सात सुरक्षा रक्षक जखमी झाले.
एक पोलीस कर्मचारी जखमी
जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवांमध्ये घाटीत झालेला हा चौथा हल्ला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनुसार, दहशतवाद्यांनी संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी गंडोह परिसरातील एका गावात तपास दलावर गोळीबार केला असता याचे उत्तर देण्यासाठी कार्यवाही करण्यात आली.
दहशतवाद्यांचे स्केच जारी
पोलिसांच्या एका प्रवक्त्याने म्हटले की, 'जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी चार दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहेत. दहशतवादी भद्रवाह, थाथरी, गंहोडच्या वरील भागात असल्याचा संशय आहे. येथूनच दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. प्रत्येक दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांची माहिती तातडीने आम्हाला द्यावी अशी विनंतही नागरिकांना केली आहे.
वैष्णो देवी मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसवर हल्ला
मंगळवारी रात्री पोलिसांनी रहिवाशी जिल्ह्याती प्रवासी बसवरील हल्ल्यातील एका दहशतवाद्याचे स्केच जारी केले होते. या दहशतवाद्याबद्दल माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. रविवारी दहशतवाद्यांनी तीर्थयात्रेला जाणाऱ्या 53 सीटर बसवर गोळीबार केली. बस कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात जात असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर बस दरीत कोसळली असता घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. तर 41 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.
आणखी वाचा :