कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये भक्तीगीत वाजवल्याबद्दल सहा जणांना मारहाण करण्यात आली आहे. यावर कर्नाटक भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.
बंगळुरूच्या नागरथपेठ येथे रविवारी संध्याकाळी एका दुकानदारावर हल्ला केला. या आरोपींची ओळख पटलेली नाही. दुकानदाराने सांगितले की हल्लेखोरांच्या गटाने वारंवार पैशांची मागणी केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार एक मुलगी मोठ्या आवाजात भक्तीगीत वाजवत होती. तेव्हा हल्लेखोरांच्या गटाने हा दावा केला की प्रार्थनेची वेळ असून बंद भक्तीगीत बंद करण्याचा आदेश दिला.
हा वाद मोठ्या प्रमाणावर वाढला असून पीडित तरुणीला दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून दुकानदार आणि सहा जणांच्या गटातील भांडण व्हिडीओमध्ये दिसून आले आहे.
पोलीस उपायुक्तांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. संध्याकाळच्या वेळी दुकानदाराने मोठ्या आवाजात संगीत लावल्यामुळे शारीरिक बाचाबाची आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा, गुन्हेगारी धमकी, चिथावणी देणे, धोकादायक मार्गाने दुखापत करणे आणि इतर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेवर कर्नाटक भाजप सरकारने सोशल मीडियावर ट्विट केले आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या राज्य कारभाराच्या पद्धतीचा जनतेला फटका बसत आहे. कट्टरपंथी रस्त्यावर उतरले असून हिंदूंमध्ये प्रचंड दहशत माजली आहे. हनुमान चालीसेचा जप केल्याबद्दल हिंदूंवर ही दहशत केली जात आहे. नागरिकांच्या जीवाची हमी राहिलेली नाही.
आणखी वाचा -
Kolkata Building Collapse : कोलकाता येथे बांधकामाधीन इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू
'हातात तलवार...भारताविरोधात घोषणा', खलिस्तान्यांकडून कॅनडा दौऱ्यावर आलेल्या भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांचा विरोध