पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातल्यामुळे पटेल यांच्यावर टीका केली जात आहे. शिवप्रेमी आणि विरोधकांकडून आगपाखड केली जात असल्याचे सोशल मीडियावरून दिसून आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी एनडीए घटकपक्षांचे इतर नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केलेल्या एका कृतीने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांना घातल्यामुळे हा वाद उध्दभवला आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी माणसाच्या आणि शिवप्रेमीच्या अस्तित्वाचा विषय असतो. त्यामुळे या प्रकरणी कोणीही केलेली कृती शिवप्रेमी कदापि खाऊन घेत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरायला गेलेले असताना प्रफुल्ल पटेल हे मोदी यांच्या डोक्यावर जिरेटोप घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून सोशल मीडियावर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
संजय राऊत यांनी केली टीका -
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावरून प्रफुल्ल पटेल आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय छत्रपती झाले आहेत का? हा महाराष्ट्राचा अपमान असून आपण याचा बदला घ्यायला हवा अशी ठाम भूमिका खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री उदय सामंत यांनी दिले स्पष्टीकरण -
मंत्री उदय सामंत यांनी बोलताना अशी चूक परत होणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप कोणी घातला? यात त्यांची चूक नसून झाल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर, नाशिकच्या सभेनंतर मुंबईत करणार रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे उमेदवारी अर्ज भरताना केले जोरदार शक्तिप्रदर्शन, महाराष्ट्रातील कोण कोण नेते होते उपस्थित?