सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असून त्यामुळॆ महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रोज एक घटना समोर घडत असल्याचे दिसून येत आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गळाला एक नवीन नेता लावल्याचे दिसून आले आहे. त्यांनी शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत अभिजित पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघात वाकाव, सांगोला आणि अकलूज येथे फडणवीस यांनी सभा घेतल्या आहेत. रात्री देवेंद्र फडणवीस आणि अभिजित पाटील यांच्यात बैठक झाली असून पुढे बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस कोण कोणाला लावणार गळाला? -
अभिजित पाटील हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. ते जर भाजपसोबत गेले तर धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे मोहिते पाटील घरातील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना गळाला लावणार असल्याची माहिती मिळाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
अभिजित पाटील भाजपमध्ये का जाणार? -
अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर कर्ज असून या कारवाईतून सुटण्यासाठी ते भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 450 कोटी रुपये थकलेले असून त्यांना कारवाई रोखण्यासाठी 25 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. कारवाईतून सुटका मिळवण्यासाठी ते भाजपकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अभिजित पाटलांमुळे भाजप उमेदवारांची ताकद वाढणार -
अभिजित पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली होती. त्यांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवायला सुरुवात केली होती. सोलापूर जिल्ह्यात अभिजित पाटील हे युवा आयकॉन म्हणून ओळखले जात असून ते भाजपमध्ये जाणार असल्यामुळे कोणाला फटका बसतो ते लक्षात येईल.
आणखी वाचा -
भाजपने उज्ज्वल निकम यांना केले लोकसभेचे तिकीट जाहीर, विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे कापले तिकीट
अरविंद केजरीवाल यांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रः लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी ईडीने केली अटक