PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींनी निवृत्ती घ्यावी: संजय राऊत | Marathwada Farmers Relief

PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींनी निवृत्ती घ्यावी: संजय राऊत | Marathwada Farmers Relief

Published : Sep 17, 2026, 07:00 PM IST

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र मोदी यांनी वयाची 76 वर्षे पूर्ण केली असून आता राजकारणातून निवृत्ती घेऊन पुढील आयुष्य सामाजिक कार्यासाठी द्यावे, असे राऊत म्हणाले. देशाच्या नेतृत्वात बदलाची गरज असल्याचे सांगत देशाला तरुण नेतृत्वाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. शिंदे यांचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह असल्याचा दावा करत त्यांच्या शिवसेनेचे मुख्यालय गुजरातमध्ये असल्याची टीका त्यांनी केली. वाढदिवसानिमित्त मोदी गुजरातमध्ये असल्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या आश्वासनावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी आतापर्यंत 760 आश्वासने दिल्याचा दावा राऊत यांनी केला आणि ती पूर्ण झाली नसल्यामुळे आंदोलन सुरू असल्याचे म्हटले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवून सरकारला तीन महिन्यांची मुदत दिल्याबाबत राऊत यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता असल्याचे सांगत आता जबाबदारी सरकारवर असल्याचे ते म्हणाले. मंत्र्यांनी आधी जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेल्याचा उल्लेख करत सरकार त्यांच्या बाबतीत दुटप्पीपणे वागत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

03:10PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी मुरलीधर मोहोळांचा सेवा उपक्रम
14:50Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस | Marathwada Farmers Relief
02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan
09:39Manoj Jarange | मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं सहकार्याचं आवाहन Eknath Shinde on Jarange
03:36मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून रवाना | Manoj Jarange | Maratha Protest
03:23Manoj Jarange | जरांगे अंतरवलीतून निघताच मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रिया fadanvis on jarange
04:32Chandrashekhar Bawankule | 18 जिल्ह्यांच्या दुष्काळावर चंद्रशेखर बावनकुळे | Disha Salian Case
08:15Land Titling Act | A to Z information | निश्चित प्रॉपर्टी कार्डसाठी महत्त्वाचा कायदा | pune | mumbai
07:07MPSC EXAM चे आता असेल वेळापत्रक, गैरप्रकार रोखणार बळकटी आणणार PUNE