
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज पुष्पक विमान (RLV-TD) चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे . प्रक्षेपणानंतर विमानाचे यशस्वी लँडिंग देखील झाले यामुळे इस्रोला आज मोठं यश मिळालं आहे. इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक आज सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे. RLV LX-02 लँडिंगने भारताने लॉन्च व्हेईकल (RLV) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला आहे.
या संदर्भात इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, भारतात पुष्पक प्रक्षेपण वाहन बनवणे हे भारताच्या अंतराळ मोहिमेला किफायतशीर बनवण्यासाठी एक मोठं आणि आव्हानात्मक पाऊल होतं. मात्र, पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन बनून, हे वाहन मोहिमेच्या यशानंतर पृथ्वीवर परत सुरक्षितपणे उतरण्यास सक्षम असेल तसेच देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे असंही ते म्हणाले.
'हे' आहे खास वैशिष्ट्य :
आणखी वाचा :
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागणार की तुरुंगातून चालवणार सरकार?
मलाड येथे 15 फूट खोल गटारात पडून परिवारातील दोन जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक