
गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अभिजीत दिपके यांच्यावर टीका केली. अभिजीत दिपके हे काँग्रेसची ‘B टीम’ असल्याचा दावा करत त्यांनी गांधींचे गौरवीकरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कमी दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. IIT मधील वाकोडे विद्यार्थ्याच्या प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना सदावर्ते यांनी काँग्रेसची ‘C पार्टी’ म्हटले. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनावरही त्यांनी टीका केली आणि राज-उद्धव यांचे राजकारण लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असल्याचा दावा केला. या मुद्द्याचा रोजगार, विद्यार्थ्यांचे शिक्षण किंवा लोकांच्या जीवनमानाशी संबंध नसल्याचे ते म्हणाले. मोर्चामुळे रोजंदारी कामगार, टॅक्सीचालक आणि व्यावसायिकांच्या कामावर परिणाम होत असल्याचे सांगत सदावर्ते यांनी भायखळ्यातून मोर्चा नेण्यास विरोध केला. तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच सायलेंट झोनच्या मुद्द्यावर संबंधितांना कोर्टात खेचणार असल्याचे सदावर्ते म्हणाले.