प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळायला हवेत, सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

Published : Jun 09, 2025, 11:58 AM IST
Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Chief Mohan Bhagwat (File Photo/ANI)

सार

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी जातिभेद नष्ट करून सर्वांना मंदिर, जलाशय, श्मशानभूमीसारख्या सार्वजनिक संसाधनांवर समान अधिकार मिळायला हवेत, असे म्हटले आहे. त्यांनी कानपूर येथील विकास वर्ग शिबिरात सर्वसमावेशक राष्ट्राची संकल्पना मांडली.

नई दिल्ली | प्रतिनिधी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातिवादावर आघात करतांना म्हटले आहे की, प्रत्येक नागरिकाला मंदिर, जलाशय, श्मशानभूमी यासारख्या सार्वजनिक संसाधनांवर समान अधिकार मिळायला हवेत. कानपूर येथे आयोजित “विकास वर्ग” शिबीरात त्यांनी सर्वसमावेशक राष्ट्राची परिकल्पना मांडली, जिथे जातीभेदापासून मुक्त समाज आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीचा प्रसार होईल असंही त्यांनी बोलताना म्हटलं आहे. .

भागवत म्हणाले की आरएसएसचे शंती वर्षाचे पंच परिवर्तन हेच समाजातील सर्व आर्थिक-आध्यात्मिक स्तरांपर्यंत संघाचे मूल्य पोहोचवण्याचे माध्यम ठरणार आहे. त्यांनी स्वयंसेवकांना आह्वान केले की त्यांनी ग्रामीण आणि नागरी भागात शाखा वाढवून प्रत्येक कुटुंबाशी आरएसएसचा संपर्क वाढवायला हवा.

४०० हून अधिक स्वयंसेवकांसमोर दिलेल्या भाषणात आत्मनिर्भर आणि जबाबदारीची जाणीव असणाऱ्या नागरिक निर्मितीची कर्मभूमी म्हणून संघाची भूमिका अधोरेखित केली. भागवत यांनी स्पष्ट केले की सार्वजनिक संसाधने सर्वांसाठी उपलब्ध होणे हे समाजिक समरसतेचे मूळ आहे. त्यांनी सांगितले: “मंदिर, पाण्याचे ठिकाणे, स्मशानं ही सार्वजनिक परिमाणे आहेत—यावर प्रत्येकाचा समान हक्क हवा.”

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Parliament Winter Session : वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा; PM मोदी दुपारी १२ वाजता सुरुवात करणार, नक्की काय आहे वाद घ्या जाणून
IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द