अखेर उलगडा झाला, हनिमुनला गेल्यावर सोनमनेच केला राजाचा खून, पोलिसांनी तिला घातल्या बेड्या

Published : Jun 09, 2025, 08:48 AM ISTUpdated : Jun 09, 2025, 09:33 AM IST
Indore couple crime news

सार

मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या नवविवाहित जोडप्यापैकी पतीचा मृतदेह धबधब्याजवळ आढळला. तपासात पत्नीनेच खुनी कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली आहे.

इंदूरच्या सोनम आणि राजा रघुवंशी या नवविवाहित जोडप्याच्या मेघालयमधील हनीमूनमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेव्हा हे जोडपं २३ मे रोजी अचानक बेपत्ता झालं, तेव्हा प्रथमदर्शनी ही घटना अपघाती वाटत होती. मात्र, तपास जसजसा पुढे गेला, तसतसं एक भीषण सत्य उघड झालं, सोनमनेच पती राजाचा खुनी कट रचला होता.

मेघालयच्या शिलाँगजवळील वाई सॉडॉन्ग धबधब्याजवळ २ जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत सापडला. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. पोलीस तपासात समोर आले की, सोनमने मध्य प्रदेशातील तीन गुन्हेगारांना पैसे देऊन राजाची हत्या केली. घटनेच्या दिवशी सोनम तीन अनोळखी पुरुषांसह दिसल्याचे सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या म्हणणीतून स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात मेघालय पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक केली आहे. तिच्या ताब्यातून काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून, आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी केली आहे. तर मेघालयचे मुख्यमंत्री आणि पोलिस अधीक्षकांनी SIT मार्फत सुरू असलेल्या तपासाचे कौतुक केले आहे.

सोनम सर्यूवंशीने केले आत्‍मसमर्पण

या प्रकरणी मेघालयाचे पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले की, सोनम सूर्यवंशीने उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. यानंतर तिला अटक करण्यात आली. पत्नीनेच राजा रघुवंशी यांच्‍या हत्‍येसाठी तिघांना सुपारी दिली होती. गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी काही लोकांना पकडण्यासाठी मध्य प्रदेशात अजूनही कारवाई सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!