Redmi Note 17 Pro: एकदा चार्ज करा, ४ दिवस विसरा! 50MP कॅमेऱ्यासह उद्या भारतात लाँच

vivek panmand   | CMS
Published : Sep 14, 2026, 05:00 PM IST
Redmi Note 17 Pro: एकदा चार्ज करा, ४ दिवस विसरा! 50MP कॅमेऱ्यासह उद्या भारतात लाँच

सार

एकदा चार्ज केल्यावर चार दिवस बॅटरी टिकणार आणि 50MP चा जबरदस्त कॅमेरा... Redmi Note 17 Pro उद्या भारतात येतोय. यात 12GB रॅमसह अनेक दमदार फीचर्स आहेत.

बंगळुरू (१४ सप्टेंबर): स्मार्टफोनच्या दुनियेत धुमाकूळ घालायला Redmi तयार आहे. कंपनी आपला नवीन फोन Redmi Note 17 Pro उद्या, म्हणजे १५ सप्टेंबरला, भारतात लाँच करत आहे. या फोनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे याची 10,000mAh ची बॅटरी, जी एकदा चार्ज केल्यावर तब्बल चार दिवस टिकते. सोबत 50MP चा कॅमेरा आणि आयफोनला टक्कर देणारे फीचर्स कमी किमतीत मिळत आहेत.

Redmi Note 17 Pro ची किंमत

नवीन Redmi Note 17 Pro दिसायला खूपच आकर्षक आहे. Redmi Note 17 Pro ची किंमत ४०,००० रुपये आहे, तर Redmi Note 17 Pro Max मॉडेल ४७,९९९ रुपयांना मिळेल. आयफोनसारख्या महागड्या फोन्सच्या तुलनेत हे फोन खूपच कमी किमतीत जवळपास सर्व फीचर्स देतात. विशेष म्हणजे, यात जास्तीत जास्त फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Redmi Note 17 Pro Max मध्ये Qualcomm Snapdragon 6 Generation 5 प्रोसेसर आहे. सोबत 12GB LPDDR5X रॅम आणि 512GB स्टोरेज दिलं आहे. त्यामुळे फोन हँग होण्याची किंवा स्लो होण्याची चिंता नाही. याला TUV SUD 5-स्टार टायटन क्वालिटी सर्टिफिकेशन मिळालं आहे. फोनमध्ये 6.83-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याची 3,500nits ची ब्राईटनेस आणि गोरिला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन स्क्रिनला सुरक्षित ठेवतं.

जबरदस्त कॅमेरा

कंपनीने 'सिक्रेट सनराईज' नावाचा एक खास कलर सादर केला आहे. त्याशिवाय, लॅव्हेंडरसारखे नेहमीचे कलर्ससुद्धा उपलब्ध असतील. प्रो आणि प्रो मॅक्स दोन्ही फोन्समध्ये चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप असेल, ज्यात दोन सेन्सर आणि एक फ्लॅश आहे. 50MP चा मुख्य कॅमेरा AI सपोर्टसह येतो, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ एकदम क्लिअर येतात.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Berlin Marathon: बर्लिन मॅरेथॉनमध्ये चिनी इन्फ्लुएन्सरची चोरी पकडली, सायकलवरून मारली शॉर्टकट!
Morgan Stanley: मॉर्गन स्टॅनलीने MARA, RIOT, GLXY चे टार्गेट घटवले, तरीही १००% पेक्षा जास्त फायद्याची शक्यता