Rajasthan School Building Collapse : शाळेची इमारत कोसळून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, झालावाडमधील भीषण दुर्घटना

Published : Jul 25, 2025, 12:05 PM IST
Rajashtan

सार

राजस्थानमधील झालावाड येथे आज सकाळी शाळेची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

Rajasthan School Building Collapse : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात आज (२५ जुलै) सकाळी एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. मनोहरथाना ब्लॉकमधील पिपलोदी गावातील सरकारी उच्च प्राथमिक विद्यालयाची छत अचानक कोसळली. काही वेळातच इमारतीची भिंतही कोसळली, आणि या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, जेसीबी मशिनच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थही प्रशासनासोबत मदतीसाठी धावले आहेत.

 

 

शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली असून, जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. झालावाडचे पोलीस अधीक्षक अमित कुमार बुडानिया आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. जखमी विद्यार्थ्यांना मनोहरथाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (CSC) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातावेळी शाळेमध्ये सुमारे ६० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार छत कोसळल्याने अनेक विद्यार्थी आत अडकले असण्याची शक्यता असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.अपघाताचे संभाव्य कारण म्हणजे शाळेची जीर्ण अवस्थेतील इमारत, जी मुसळधार पावसामुळे आणखी कमकुवत झाली होती. भिंतींमध्ये आर्द्रता निर्माण झाल्यामुळे संरचना कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेबाबत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोतयांनी ‘X’  वर शोक व्यक्त करत म्हटले की, “झालावाडच्या मनोहरथाना येथील एका शाळेची इमारत कोसळल्याने अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची दुःखद माहिती मिळाली आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जीवितहानी कमी व्हावी आणि जखमींना लवकर बरे वाटावे.”

PREV
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!